खासदार श्रीकांत शिंदेंचे जल्लोषी स्वागत करणार

खासदार श्रीकांत शिंदेंचे जल्लोषी स्वागत करणार

खासदार श्रीकांत शिंदेंचे जल्लोषी स्वागत करणार

राजेश क्षीरसागर ः शहर शिवसेनेच्या बैठकीत माहिती

कोल्हापूर, ता. २५ ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे उद्या (ता.२६) कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, त्यांचे करवीर नगरीत जल्लोषी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.
खासदार शिंदे प्रथमच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिंदे दुपारी साडेतीन वाजता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट देणार आहेत. या ठिकाणी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी अशा पद्धतीने त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने औक्षण करण्यात येणार आहे. यानंतर ते शिवालय येथे पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. यानंतर संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्था आयोजित राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्याला ते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी केल्या.
बैठकीस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजित जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले आदी उपस्थित होते.
.........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com