
संक्षिप्त
शहरात आज पाणीपुरठा बंद राहणार
कोल्हापूर ः बालिंगा पाणी उपसा केंद्राकडील उच्चदाब वाहिनीच्या तांत्रिक कामासाठी रविवारी (ता.२६) वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांवरून पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे सी, डी, ए, बी, ई वॉर्डमधील अनेक भागांत पाणीपुरवठा होणार नाही. सोमवारी (ता.२७) सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
---------------
‘पाच फूटाचा बच्चन''
प्रयोग आज रंगणार
कोल्हापूर ः ऑर्फियस स्टुडिओ आणि रोम रोम रंगमंच निर्मित ‘पाच फुटाचा बच्चन'' या नाटकाचा प्रयोग रविवारी (ता.२६) सायंकाळी साडेपाचला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. अल्पावधीतच या नाटकाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून मुळचे कोल्हापूरचे कौस्तुभ देशपांडे यांनी ते लिहिले आहे. श्रुती मधुदीप दिग्दर्शित हे नाटक गावगाड्यातून आलेल्या एका सुपरस्टारच्या कथेवर आधारित आहे.
----------