हरीकाका गोसावी मठात विविध कार्यक्रम उत्साहात

हरीकाका गोसावी मठात विविध कार्यक्रम उत्साहात

gad275.jpg
91680
हत्तरगी : हरीकाका गोसावी मठात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीचे वितरण डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी केले. बसवप्रभू स्वामी, दत्ता देशपांडे, गुरुनाथ कुलकर्णी, मोहन दंडीन, वहिदा मुल्ला आदी उपस्थित होते.
----------------------------
हरीकाका गोसावी मठात
विविध कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : हत्तरगी (ता. हुक्केरी) येथील हरीकाका गोसावी ऋग्वेदी भागवत मठात प. पू. एकनाथ गोसावी यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सीमाभागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप व ग्रंथालयाचा प्रारंभ केला. पिठाधीश डॉ. आनंद उर्फ नरसिंह गोसावी अध्यक्षस्थानी होते. गटशिक्षणाधिकारी मोहन दंडीन, दत्ता देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या सीमाभागातील १०५ विद्यार्थ्यांना मठातर्फे एक लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण केले. एकनाथ गोसावी ग्रंथालयाचे उद्‍घाटन बसवप्रभू स्वामी यांच्याहस्ते झाले. लम्पी बाधित जनावरांवर उपचार करणारे निवृत्त सहायक आयुक्त डॉ. सुधाकर जाधव, वर्णोपचारक सुभाष पारपोलकर, मलिक कादरभाई, बसवराज आगसगी, डॉ. आपन्ना कोरी यांचा सत्कार झाला. हरीकाका संस्कृत पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. डॉ. आनंद महाराज गोसावी, दत्ता देशपांडे, मोहन दंडीन, गुरुनाथ कुलकर्णी, बसवप्रभू स्वामी यांच्यासह सई जाधव (जरळी) या विद्यार्थिनीचे भाषण झाले.
वेणुगोपाल गोसावी, चारुदत्त गोसावी, सुमित्रादेवी गोसावी, प्रकाश आवलक्की, वहिदा मुल्ला, व्यंकटेश सरनोबत, लक्ष्मी सरनोबत, आर. जी. कुलकर्णी, शशीशेखर जनवाडकर, टी. एम. दुंडगे, विठ्ठल चौगुले, सुरेंद्र बांदेकर, अजित पाटील, राजेंद्र शेलार आदी उपस्थित होते. विश्वस्त प्रा. सुनील देसाई यांनी स्वागत केले. डॉ. श्रीशैल मठपती यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब मुरगी व शिवानंद मठपती यांनी सूत्रसंचालन केले. मेघना बालीघाटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com