विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन वर्षे साधी कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन वर्षे साधी कैद
विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन वर्षे साधी कैद

विनयभंग प्रकरणी आरोपीला दोन वर्षे साधी कैद

sakal_logo
By

92267

विनयभंग प्रकरणी हातकणंगलेतील
एकास दोन वर्षे कारावसाची शिक्षा

कोल्हापूर,ता. २९ ः अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्या प्रकरणी आज एकास दोन वर्षे कारावासाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग १) पी.एफ. सय्यद यांनी सुनावली. संतोष बापू पाटील (वय ४२, रा. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. १९ नोव्हेंबर २०२०ला हा गुन्हा घडला होता. याची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे.
नोव्‍हेंबर २०२० मध्ये पिडीत व फिर्यादी तिची आई घरात असताना संतोष पाटील याने अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. यानंतर तिच्या आईने एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्यादी दिली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक ए.एस.लोखंडे यांनी अधिक तपास केला. यानंतर त्यांनी विनयभंगासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२च्या काही कलमांनुसार गुन्हा दाखल केला. दोषारोपत्रानुसार खटला सुरू झाला. यामध्ये सहाय्यक सरकारी वकील राजेश व्ही.चव्हाण यांनी चार साक्षीदार तपासले. दोन्‍ही बाजूच्या युक्तीवादानंतर नयायाधीशांनी संशयित आरोपी संतोष पाटील याला दोन वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावल्याची माहिती ॲड. चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांना पोलिस अधिकारी सागर पाटील, पैरवी अधिकारी अंकूश पाटील यांनी सहकार्य केले.