हलकर्णीत चोरी

हलकर्णीत चोरी

हलकर्णीत रोकडसह
पाऊण लाखाचे दागिने लंपास

नूल, ता. ३० :  हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील कुंभार गल्लीतील मनोहर कागीनकर (वय 65) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सोने, चांदी व दहा हजार रोख रकमेसह सुमारे 72 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला. ही घटना मंगळवारी (ता. 28) रोजी पहाटेच्या वेळी घडली.
यासंदर्भात कागीणकर यांनी हलकर्णी दुरक्षेत्र पोलिसात फिर्याद दिली आहे. कागीनकर खाजगी नोकरीत आहेत. घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडून घरातील लोखंडी कपाट हे पाठीमागील दरवाजातून बाहेर हिरेमठ यांच्या शेतात नेले. व कटावणीने उचकटून तिजोरीमध्ये ठेवलेला सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या रिंगा, टॉप्स, सोन्याची अंगठी, चांदीचा कमरपट्टा या ऐवजासह रोख दहा हजार रुपये असा एकूण 72 हजार रुपये रकमेची चोरी झाली आहे. या घटनेचा हलकर्णीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिवसे अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com