मुद्रांक शुल्कचे मार्च अखेर ११९.५२ टक्के उद्दीष्ट पूर्ण

मुद्रांक शुल्कचे मार्च अखेर ११९.५२ टक्के उद्दीष्ट पूर्ण

रेडीरेकनरचे दर उद्या ठरणार
मुद्रांक शुल्क विभागाचे ४१८.३५ कोटी संकलन

कोल्हापूर, ता.३० ः मुद्रांक शुल्क विभागाचे चालू आर्थिक वर्षातील ११९.५२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर वाढणार असल्याने मुद्रांक शुल्कातील व्यवहार पूर्ण करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची धावपळ सुरू आहे. या वर्षी रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे रेडीरेकनरचा दर काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुद्रांक शुल्क विभागाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३२९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. या वर्षात मुद्रांक शुल्क विभागाने ३५६.५४ कोटी रुपयांचे संकलन केले. एकूण उद्दिष्टापैकी त्यांनी १०८.३७ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. चालू २०२२-२३ वर्षात विभागाला ३५० कोटीचे उद्दिष्ट मुद्रांक शुल्क विभागाला देण्यात आले आहे. मात्र, अत्तापर्यंत या विभागाने ४१८.३५ कोटी रुपये उद्दिष्ट पूर्ण केले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ११९.५२ टक्के पूर्ण झाले आहे. १ एप्रिलला पुढील वर्षातील रेडीरेकनरचा दर ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com