विवेकानंद शिक्षण संस्था

विवेकानंद शिक्षण संस्था
Published on

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था-
एज एफ्एक्स टेक्नॉलॉजीमध्ये करार


कोल्हापूर, ता. ९ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि एज एफ्एक्स टेक्नॉलॉजी यांच्यात संस्था स्तरावर सामंजस्य करार करण्यात आला. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अध्यापन-अध्ययन तंत्र, संशोधन क्षमता, तंत्रज्ञानातील अद्ययावत ज्ञान, समस्या सोडविणे, रोजगार क्षमता, नाविन्य, सहकार्य, नेतृत्व आणि व्यावहारिक कौशल्ये यांचा विकास केला जाईल.’ संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित होते.
एज एफएक्स टेक्नॉलॉजीचे राष्ट्रीय प्रमुख राजदील जमादार यांनी सांगितले की, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, सरकार आणि धोरणकर्ते यांना २१ व्या शतकातील गतीशील अर्थव्यवस्था निर्माण करावयाची आहे. यासाठी उपयुक्त ठरतील अशी कौशल्ये विकसित करण्यासाठी आमची संस्था व्यासपीठ प्रदान करते. या कराराअंतर्गत संस्थेतील शाळा, महाविद्यालयांत इनक्युबेशन सेंटरची उभारणी केली जाईल.’ संस्थेचे महाराष्ट्र प्रमुख राहुल यादव, प्राचार्या गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी याबद्दल संस्थेची भूमिका स्पष्ट केली. सामंजस्य करारातील प्रत्येक शाखेने करावयाची पूर्तता व त्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे याविषयी संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांनी माहिती दिली. आभार प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com