भेसळीचा आजार मालिका भाग ३

भेसळीचा आजार मालिका भाग ३

भेसळीचा आजार : भाग तीन

चिकन थाळी खा १०० रुपयात!
‘आफर’मागे दडलंय काय?; कमी पैशात नफा मिळवण्यासाठी छुप्या मार्गाचा अवलंब

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शहरासह ग्रामीण भागातही शंभर रुपयात चिकन थाळी असे फलक दिसतात. बाजारात चिकनचा दर २२० ते २६० असताना शंभर रुपयांमध्ये थाळी कशी परवडते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो; पण त्याहीपेक्षा या चिकनची शुद्धता किती हा प्रश्न अधिक गंभीर आहे.
गरीब आणि गरजू लोकांची या शंभर रुपयांच्या चिकन थाळीने चांगली सोय होते. मात्र, हे चिकन खाल्यानंतर औषधाला जाणारे पाचशे रुपये हा भुर्दंडच ठरतो. कोल्हापुरात शुद्ध चांगले मांसाहारी जेवणाची सुविधा देणारे हॉटेल मालक वर्षानुवर्षे मांसाहारी जेवण पुरवत आहेत. अशांना चिकन ताट, मटण ताट, मासे ताट किती रुपयाला द्यावे याचा अंदाज आहे. त्यांच्याकडे १८० ते २५० रुपये चिकनच्या थाळीचा दर असतो. त्यासाठी चांगल्या कोंबडीचे मटण, दोन चपात्या, भात, तांबडा-पांढरा रस्सा, कांदा-लिंबू, सोलकढी याचा उत्पादन खर्च काढला तर तो किमान शंभर रुपयांपर्यंत सहज जातो. याशिवाय गुंतवणूक, कर्मचाऱ्यांचे वेतन, कच्चा माल यावरील खर्च धरून ताटाची किंमत वरीलप्रमाणे ठरवली आहे. त्यामुळे चिकन ताट किमान दीडशे रुपयांच्या पुढेच विकावे लागते असेही या जाणकारांचे मत आहे. मग शंभर रुपयांमध्ये चिकन ताट कसे परवडते? येथेच गडबड आहे. जिवंत पक्षी आजारी असेल तर त्याचे मांस खाण्यासाठी वापरू नये. मृत कोंबड्या चिकन म्हणून खाण्यास अयोग्य मानल्या जातात. जखमी किंवा गंभीर आजारी कोंबड्या ही अजिबातच खाऊ नये असे संकेत आहेत. मात्र, काही ठिकाणी अशा कोंबड्या निम्या किमतीत मिळतात. त्यामुळे त्यांचे चिकन स्वस्त दरात विकले जाते असा संशय आहे. चिकन बनवण्यासाठी पूरक मसाला हा ताजा असावा. मात्र इथे काही वेळेला शिल्लक मसाला किंवा शिळा मसाला परत फोडणी मारून ताजा असल्याचे भासवले जाते. असे काही ठिकाणी घडते. कमी पैशात नफा मिळवण्यासाठी छुप्या मार्गाने खाण्यास अयोग्य ठरू शकतील, असे चिकन मांस काही ठिकाणी विक्री होत असल्याचा संशय आहे.
केवळ चिकन ताट्याच्या दरावरून चिकनची शुद्धता ठरवता येते असे नाही. पण, काही ठिकाणी कमी प्रतीचे चिकन वापरून स्वस्तात विकले जाते. हे मात्र शुद्ध चिकन देणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय केल्यासारखे होईल.
---
चौकट
जिल्हाभरातील चित्र
दिवसाला चिकन व कोंबड्या विक्री - सव्वा लाख ते १ लाख ६० हजार
नोंदणीकृत हॉटेल्स -१४५०
चिकन देणाऱ्या हातगाड्या किंवा फिरते विक्रेते - १२००
चिकन अथवा कोंबड्यांची तपासणी - १० ते २०
----
कोट
कोंबडी जन्माला आल्यापासून ५३ आठवड्यानंतर खाण्यासाठी योग्य होते. कडकनाथ व ब्लॅक लॅब्रो स्ट्रोक या दोन्ही प्रकारच्या कोंबड्या खाण्यासाठी सध्या जास्त प्रमाणात वापरल्या जातात.
-डॉ‌. सेम लुडीर्क, पशुवैद्यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com