‘बांधकाम कामगार’ कृती समितीतर्फे धरणे

‘बांधकाम कामगार’ कृती समितीतर्फे धरणे

ich102.jpg
94788
इचलकरंजी : सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संयुक्त कृती समितीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
---------------
‘बांधकाम कामगार’ कृती समितीतर्फे धरणे
संघटनेच्या लेटरहेडवर स्मार्ट कार्ड, पावती पूर्वीप्रमाणे मिळण्याची मागणी
इचलकरंजी, ता. १० : स्मार्ट कार्ड व नुतनिकरण पावती घेण्यासाठी प्रत्यक्ष कामगाराने स्वतः उपस्थित असणे आवश्यक केल्याने कामगारांना रोजंदारी बंद करून यावे लागते. त्याच्या परिणाम उदरनिर्वाहावर होत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे संघटनेच्या लेटरहेडवर स्मार्ट कार्ड व पावती मिळावे या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे धरणे आंदोलन केले. मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्तांना दिले.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात बांधकाम कामगारांची नवीन नोंदणी, नुतनीकरण आणि नोंदीत कामगारांना योजनेचा लाभ देण्याचे काम २०१३ पासून चालत आहे. पूर्वी हे काम ऑफलाईन पध्दतीने चालत होते. त्यामुळे कामगारांना लवकर लाभ मिळत होते. मात्र महाराष्ट्र शासनाने जुलै २०२० पासून ऑनलाईन पध्दतीने चालू केले आहे. त्या वेळेपासून बांधकाम कामगारांना नोंदणी, नुतनीकरण आणि लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. ऑनलाईन पध्दत सामान्य कामगारांना अजून समजलेली नाही. त्यामुळे कामगारांची फसवणूक केली जात आहे. कार्यालयात युनियनच्या लेटरहेडवर कामगारांची यादी दिल्यास स्मार्ट कार्ड व पावती मिळत होती. मात्र हे काम बंद केले आहे. त्यामुळे कामगार आणि संघटनांमध्ये असंतोष तयार झाला आहे. हेच काम कोल्हापूर आणि सांगली ऑफिसमध्ये विनासायास सुरू आहे. इचलकरंजीमध्येही पुन्हा लेटरहेडवर स्मार्ट कार्ड व पावती मिळावी. अन्यथा हे आंदोलन बेमुदत सुरु ठेवावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com