गारपीटीने सुमारे दहा कोटींचे नुकसान

गारपीटीने सुमारे दहा कोटींचे नुकसान

chd101.jpg
94841
पार्ले ः वादळी वारा आणि गारांसह झालेल्या पावसाने बिनीसचे पिक असे अस्ताव्यस्त झाले आहे.
-------------------------
chd102.jpg
94842
जागोजागी अशी झाडे उन्मळून पडली आहेत.
------------------------------------
गारपीटीने सुमारे दहा कोटींचे नुकसान
पार्ले, जेलुगडे परीसर; भाजीपाला जमीनदोस्त, फळे गळाली, वृक्ष उन्मळले
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० ः तालुक्यातील पार्ले, जेलुगडे, कळसगादे परीसरात वादळी वारा आणि गारांसह झालेल्या पावसाने बिनीस, मिरची भाजीपाला पिके जमीनदोस्त झाली आहेत.
या तीन गावांत मिळून सुमारे बाराशे एकरवर भाजीपाला पिके घेतली जातात. त्यावरच शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र चालते. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. सुमारे आठ ते दहा कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. त्याशिवाय आंबा, काजू, फणस, जांभूळ यासारख्या फळझाडांची फळे गळून पडली. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तालुक्याच्या दक्षिण भागातील कळसगादे, पार्ले, जेलुगडे पासून तिलारीनगर पर्यंतचा पट्टा हा पांढऱ्या हिणकस मातीचा. अति पावसामुळे या जमिनीत भाताशिवाय इतर पिकच होत नव्हते. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता नसल्याने आठ महिने शेती पडून रहात होती. काही वर्षापासून येथील शेतकऱ्याने विंधन विहीर, विहीरीच्या पाण्यावर भाजीपाला पिके घेण्यास सुरवात केली. नीस आणि हॉटेलींगसाठी लागणाऱ्या ओल्या मिरचीवरच भर होता. त्याचे प्रमाण एवढे वाढले की बेळगाव, गोव्याच्या बाजारपेठेत सर्वाधीक भाजीपाला येथून जाऊ लागला. केवळ तीन ते चार महिन्यात चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागल्याने अनेकांनी वीज पंप, पाईपलाईन, जमिन दुरुस्ती यात पैसे गुंतवले. यावर्षीही बिनीस व मिरचीचे उत्पादन चांगले होते. काही शेतकऱ्यांनी पहिले दोन तोडे घेतले होते. मात्र शनिवारी झालेल्या पावसाने या पिकांची माती केली.
आंबा, काजू, फणस, जांभूळ यासारखी फळझाडावरील परीपक्वतेकडे आलेली आणि कच्ची फळेसुध्दा वाऱ्याच्या हेलकाव्यामुळे गळून पडली आहेत. जागोजागी वृक्ष उन्मळून पडले आहेत. हे सर्व चित्र विदारक आहे. तीन वर्षापूर्वी कोरोनात वाहूतक व्यवस्था नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना बिनीस काढून रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली होती. यावर्षी मात्र निसर्गानेच घाला घातल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने भरपाई देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी परिसराला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. हा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
-------------------
हिणकस मातीमुळे या परीसरात काजू, आंबा, फणस यासारखी फळपिके आणि पावसाळी भात वगळता अन्य पिके होत नाहीत. काही वर्षापासून शेतकऱ्यांनी मेहनतीतून भाजीपाला उत्पादनात यश मिळवले आहे. परंतु शनिवारच्या पावसाने त्यांच्या कष्टावर पाणी फिरवले. कोरोनानंतर दुसऱ्यांदा असा फटका बसला.
- सदानंद सिताप, भाजीपाला उत्पादक शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com