कॉमन बातम्या पत्रके

कॉमन बातम्या पत्रके

‘भीम फेस्टिव्हल’चे आज उद्‌घाटन
कोल्हापूर : माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे उद्यापासून (ता. ११) १४ एप्रिलपर्यंत भीम फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.
उद्या (मंगळवारी) सकाळी नऊ वाजता बिंदू चौकात क्रांतिबा फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्त प्रा. सागर जानराव, प्रा. कुलदीप कांबळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर आणि क्रांतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात येईल. आश्किन आजरेकर, सुजाता भास्कर, धोंडीराम कांबळे, प्रभाकर कांबळे, योगेश डिगे उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता क्रांतिबा फुले वाडा यांच्या घराच्या प्रतिकृतीचे आणि भीम फेस्टिव्हलचे उद्‌घाटन आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होईल, तर प्रतिकृतीचे उद्‌घाटन आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते होईल. डॉ. सुजित मिणचेकर अध्यक्षस्थानी असतील. विशाल लोंढे, डॉ. कौस्तुभ वाईकर, दिनकर आवळे, प्रवीण सोनवणे, गणी आजरेकर, वसंत मुळीक, बबन राणगे, गौतम वर्धन, संजय कुडूकर, पी. डी. सरदेसाई, उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, दगडू भास्कर, बाजीराव नाईक, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले आणि आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष संघटना, मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
...
डॉ. शरदचंद्र साळुंखे यांना अभिवादन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे डॉ. शरदचंद्र साळुंखे यांचा तृतीय स्मृतिदिन झाला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक विभागप्रमुख आणि विद्या समितीचे अध्यक्ष श्रीराम साळुंखे, प्राचार्य जे. आर. जोशी, ज्येष्ठ शिक्षिका एम. व्ही. मोहिते, सर्व गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. पी. जे. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. जोशी यांनी डॉक्टरांसमवेत वारूळ या शाखेवर व्यतीत केलेले काही क्षण सांगितले. ए. के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
...
एक मे रोजी कंत्राटीकरणविरोधी लढ्याचे रणशिंग
कोल्हापूर : कंत्राटीकरणविरोधी मेळावा १ मे रोजी कोल्हापुरात घेऊन लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा ठराव कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्ता बैठकीत घेण्यात आला. दिलीप पोवार, अतुल दिघे, दिलीपदादा जगताप यांच्यासह विविध संघटनांतील ५० हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेमध्ये अनिल लवेकर, श्री. जगताप, दिनकर अडसूळ, श्री. पवार, एस. बी. पाटील, अॅड. बाळासाहेब पवार, श्री. दिघे, रुपाली बराले, सुभाष जाधव, अभिजित कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक कंपन्या केवळ कंत्राटी कामगारांवर चालवल्या जात असून कामगार कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. कंत्राटी कामगारांचे शोषण होत आहे. तसेच यामुळे कायम कामगारांच्या संघटनांवरही विपरीत परिणाम होत आहेत. कायम कामगारांचे महत्त्व कमी होत तेही मालकशाहीच्या पिळवणुकीचे बळी ठरत आहेत. त्यांनी लढून मिळवलेले हक्क कमी होत आहेत. कंत्राटी कामगारांत आता काही जागृती होत आहे. ते लढायलाही तयार होत आहेत, हे लक्षात घेता कृती समितीने पुढाकार घेऊन संघर्ष चालवला पाहिजे. त्यासाठी जागृती वाढवण्यासाठी एक मे रोजी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com