डी. एड. कॉलेज बंदची तरतूद रद्द करा

डी. एड. कॉलेज बंदची तरतूद रद्द करा

फोटो-
.....

़‘डी. एड. कॉलेज’ बंदची तरतूद रद्द करा

विद्यार्थ्यांची मागणी; ‘एआयएसएफ’च्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १० ः नवीन शैक्षणिक धोरणामध्ये केलेली डी.एड. कॉलेज बंद करण्याची तरतूद रद्द करावी, शासनाला अपेक्षित अद्ययावत अभ्यासक्रम डीएलएड कोर्समध्ये समाविष्ट करावा. जूनपूर्वी शिक्षकांच्या ५० हजार रिक्त जागा भरा, आदी विविध मागण्या बेरोजगार आणि डी. एड. अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी केल्या. त्यांनी या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या (एआयएसएफ ) नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. शिक्षकपदांचे कंत्राटीकरण थांबवा, डी. एड. कॉलेज बंद करू नका, अशा मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. व्हीनस कॉर्नर, बसंत बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. यावेळी ‘एआयएसएफ’चे गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हरिष कांबळे, राम करे, अभिजीत पोळ आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या आंदोलनात जावेद तांबोळी, सुनील कोळी, तृप्ती सावंत, अभिषेक पोळ, प्रियांका पाटील, पूजा जाधव, विशाखा नवले, सौम्या भिलतिया,धनश्री पाटील, प्रतीक्षा पाटील, प्रियंका पाटील, हर्षवर्धन पाटील, मुदस्सीर खान, आकाश गायकवाड आदी सहभागी झाले.
..................

मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय

या मागण्यांचे निवेदन राज्य शासनाला पाठवण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले. शिक्षक कंत्राटी पदांबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांना या प्रश्नासंबंधात माहिती देण्याचे आदेश त्यांनी दिले. आंदोलकांनी यापुढे राज्यव्यापी आंदोलन उभा करून मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे गिरीश फोंडे यांनी सांगितले.
.................

अन्य मागण्या ...

-नवीन शैक्षणिक धोरण हे संविधानविरोधी असून ते लागू करु नये.
-छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण राबवावे.
-शिक्षकपदांचे कंत्राटीकरण थांबवा.
- शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेच्या निकालाबाबत उमेदवारांच्या शंकांचे निरसन करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com