टंचाई आराखड्यात ५९१ योजना

टंचाई आराखड्यात ५९१ योजना

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

टंचाई आराखड्यात ५९१ योजना

४ कोटी ८६ लाखांचा खर्चः १५६ गावे व ३३५ वाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता

सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता.१०: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्‍ह्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. सध्या तरी १५६ गावे व ३३५ वाड्यांमध्ये टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. जिल्‍ह्यात आज सर्वच गावात जल जीवन मिशन योजनेतून पाणी योजना घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्‍हा टंचाईत गावांची संख्या वाढली तर त्याची नामुष्‍की पाणी पुरवठा विभागावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संभाव्य टंचाई जाणवणाऱ्या‍ गावांच्या पाणी योजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. टंचाई आराखड्यात ५९१ योजना असून ४ कोटी ८६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.


दरवर्षी एप्रिल महिन्यात टंचाईचा आराखडा तयार केला जातो. वर्षभराचा विचार करुन हा आराखडा तयार करण्यात येतो. मात्र पाण्याची खरी टंचाई एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्यापर्यंत सर्वाधिक असते. या काळात खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाते. पाण्याची टंचाई वाडी, वस्‍त्या आणि धनगरवाड्यांवर अधिक जाणवते. दरवर्षी टंचाईत येणाऱ्या‍ गावांची व वाड्यांची संख्या कायमच राहत असल्याने, त्याची नेमकी कारणे शोधणे आवश्यक आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाकडून यासाठी फारसी तसदी घेतली जात नाही. उन्‍हाळा सुरु झाला की, नेहमीच्याच गावांची यादी तयार केली जाते. त्यामुळे मिशन मोडवर या नियमित टंचाईच्या गावांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

यावर्षीही १५६ गावे आणि ३३५ वाड्यांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या सर्व गावांत आणि वाड्यांमध्ये मुबलक पाउस पडतो. मात्र पाणी साठवण्याच्या योजना प्राधान्याने घेतल्या जात नाहीत. तसेच जल पुनर्भरणासारखे कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत गावातील पाण्याचा ताळेबंद घेतला जात नाही, गावातील पाणी गावात, शिवारात, विहिरीत साठवले जात नाही, तोपर्यंत टंचाईच्या झळा कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
....

उपाययोजना गावे वाड्या उपाययोजना संख्या खर्च
विहिर खोलीकरण, काळ काढणे ० ० ० ५ लाख
खासगी विहिरी अधिग्रहण ६६ ६८ १३४ ८१ लाख ८० हजार
टँकरने पाणीपुरवठा ४ २४ २८ ५० लाख
नवीन विंधन विहीर ८५ ३४१ ४२६ ३ कोटी ४३ लाख २७ हजार
तात्‍पुरत्या, पूरक पाणी योजना १ २ ३ ६ लाख
एकूण १५६ ३३५ ५९१ ४ कोटी ८६ लाख ७ हजार
...

‘जिल्‍ह्यातील काही गावांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणी पुरवठा विभागाने याबाबतचा टंचाई आराखडा तयार केला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई कामांना सुरुवात केली जाईल. त्याबाबतची प्रक्रीया पूर्ण करण्यात आली आहे. जल जीवन मिशनमुळे अनेक गावांना पाणीपुरवठा सुरु होत आहे. ज्या गावांना टंचाई जाणवण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या योजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अशोक धोंगे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com