आजरा ः आजरा संघ निवडणुक अर्ज भरणी

आजरा ः आजरा संघ निवडणुक अर्ज भरणी

आजरा तालुका संघासाठी ६३ अर्ज
आजरा, ता. १० ः आजरा तालुका शेतकरी संघासाठी आज अखेर ६३ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्जभरणीचा पाचवा दिवस असून अर्ज भरणीसाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. आज संस्था गटात विजय देसाई, मनोहर पाटील यांनी अर्ज दाखल केले. व्यक्ती सभासद गटात संजय शेणगावे, विकास चाैथे, गोविंद सावंत, अबुल सतार गवसेकर, शंकर कुराडे यांनी अर्ज दाखल केले. इतर मागास गटामध्ये अनिकेत कवळेकर , अशोक चाैगुले यांनी अर्ज दाखल केले आहेत. महीलामध्ये राजश्री सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे. यापुर्वी चार दिवसात ४२ अर्ज दाखल झाले आहेत. अ वर्ग विकास सेवा संस्था गटात १३, ब वर्ग इतर संस्था गटात ४, क वर्ग व्यक्तीगत सभासद गटात १६, महिला गटात ३, इतर मागास गटात ३ तर विमुक्त जाती-विशेष मागास गटात १ अर्ज दाखल झाला आहे. अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये तालुका संघाचे विद्यमान अध्यक्ष एम. के. देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, माजी सभापती अल्बर्ट डिसोजा, जेष्ठ संचालक नारायण सावंत, अमरसिंह पवार, विक्रमसिंह देसाई, डी. ए. पाटील, संभाजी तांबेकर, देवदास बोलके, विठ्ठल देसाई, दत्तात्रय पाटील, मायादेवी पाटील, महेश पाटील यांचा समावेश आहे. या दोन दिवसात आणखीन अर्ज दाखल होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com