रामदास आठवले कार्यक्रम

रामदास आठवले कार्यक्रम

फोटो क्रमंाक : gad1011.jpg
94948
गडहिंग्लज : आदरांजली सभेत रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. किसनराव कुराडे, शहाजी कांबळे, जानबा कांबळे, बी. के. कांबळे, जानबा कांबळे आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
समाजाला जोडणारी चळवळ वाढवूया
मंत्री रामदास आठवले : गडहिंग्लजला दिवंगत पँथर्सना आदरांजली
गडहिंग्लज, ता. १० : देशाला अखंड ठेवण्याचे वैचारिक मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. त्याच धर्तीवर पँथर्स चळवळ सर्व समाज आणि जातीधर्मांना जोडणारी आहे. या चळवळीला कोल्हापूर जिल्ह्याने चांगले बळ दिले. भविष्यात चळवळ वाढवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
गडहिंग्लज तालुका रिपब्लिकन पार्टीतर्फे (आठवले गट) आयोजित तालुकाध्यक्ष कै. मलाप्पा कांबळेंसह दिवंगत पँथर्सना आदरांजली सभेत ते बोलत होते. शिवराज महाविद्यालयाच्या रंगमंचावर सभा झाली. प्रा. किसनराव कुराडे, राज्य संघटन सचिव शहाजी कांबळे, राज्य उपाध्यक्ष विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, बी. के. कांबळे, जानबा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. आठवले म्हणाले, ‘गडहिंग्लज विभागात मलाप्पा कांबळेंसारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे पँथरची चळवळ वाढविण्यात मोठे योगदान आहे. ही चळवळ यापुढेही वाढविणे हेच दिवंगत पँथर्सना खरी आदरांजली ठरणार आहे. त्यांच्या कुटूंबांची भेट झाली नसली तरी त्यांच्या अडचणी दूर करु.’ यावेळी प्रा. किसनराव कुराडे, बी. के. कांबळे, जानबा कांबळे, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर कांबळे, जयवंत कांबळे, विठ्ठल चुडाई, मोहन बारामती, महेश सलवादेंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com