''इंगवले सर'' फुटबॉल चषक

''इंगवले सर'' फुटबॉल चषक

96665
कोल्हापूर : झुंझार क्लब आयोजित इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध सम्राट नगर फुटबॉल क्लब यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

लोगो - ‘इंगवले सर’ फुटबॉल चषक 
शिवाजी मंडळ, ‘बालगोपाल’चे विजय 
एकतर्फी लढती; सम्राटनगर फुटबॉल क्लब, संध्यामठ पराभूत
कोल्हापूर, ता. १७ : झुंजार क्लब आयोजित ‘इंगवले सर’ फुटबॉल चषक स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळ संघाने सम्राटनगर फुटबॉल क्लब संघावर ६ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. बालगोपाल तालीम मंडळ संघाने संध्यामठ तरुण मंडळ संघावर १ विरुद्ध ० गोल फरकाने विजय मिळवला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे.
श्री शिवाजी मंडळ विरुद्ध सम्राटनगर यांच्यातील सामना एकतर्फी झाला. सातत्याने आक्रमक खेळणाऱ्या मंडळ संघाने नवख्या सम्राटनगर संघावर अर्धाडझन गोल नोंदवले. सुरुवातीलाच ५ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर विशाल पाटील याने गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली. या नंतर सिद्धेश साळोखे याने १० व्या मिनिटाला तर सुयश हांडे याने २७ व्या मिनिटाला गोल नोंदवत मंडळ संघाला पूर्वार्धात ३ -० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात देखील सम्राटनगर संघाला फारसे यश आले नाही. मंडळ संघाच्या करण चव्हाण - बंद्रे याने चौथ्या गोलची नोंद केली. पाठोपाठ संदेश कासार याने ४७ व्या मिनिटाला. तर करण चव्हाण - बंद्रे याने ४८ व्या मिनिटाला वयक्तिक दुसरा, तर संघासाठी ६ वा गोल नोंदवला. सामना संपेपर्यंत मंडळ संघाचे ५ फटके गोल जाळीवरून गेल्याने गोल झाले नाहीत. बालगोपाल विरुद्ध संध्यामठ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीला संध्यामठ संघाने आक्रमक चाली रचल्या. बालगोपाल संघाची बचाव फळी भेदत गोल साठी प्रयत्न केले मात्र यश आले नाही. बालगोपाल संघाने संधी साधत आक्रमण केले यात १३ व्या मिनिटाला प्रसाद सरनाईक याने गोल नोंदवत सामन्यात एक गोलने आघाडी घेतली. या नंतर पूर्ण वेळ दोन्ही संघांकडून प्रयत्न झाले मात्र गोल नोंदवता आले नाहीत.
----------------
सामनावीर 
करण चव्हाण - बंद्रे - शिवाजी मंडळ 
ऋतुराज पाटील - बालगोपाल 

लढवय्या 
आकाश काटे - सम्राटनगर 
श्रेयश मरळकर - संध्यामठ

आजचे सामने
सकाळी ७ प्रॅक्टिस विरुद्ध कोल्हापूर पोलीस
संध्याकाळी ४ पीटीएम अ विरुद्ध बीजीएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com