महामस्तकाभिषेक सोहळा

महामस्तकाभिषेक सोहळा

फोटो-

कोल्हापूर ः शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन जैन मठात शनिवारी भगवान १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक झाला. (बी.डी.चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)
...

मंगलमय वातावरणात
महामस्तकाभिषेक सोहळा

शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन मठात दिवसभर धार्मिक विधी


कोल्हापूर, ता. २२ ः ‘आदिनाथ भगवान की जय'' असा जयघोष आणि मंगलमय वातावरणात येथील शुक्रवार पेठेतील लक्ष्मीसेन मठात भगवान १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर आज महामस्तकाभिषेक झाला. यंदा सोहळ्याचे बासष्ठावे वर्ष होते. दिवसभर येथे देशभरातून श्रावक-श्राविकांनी मोठी गर्दी केली. यापूर्वी काही वर्षे हा सोहळा मे मध्ये व्हायचा. पण, यंदापासून पुन्हा परंपरेप्रमाणे अक्षय तृतीयेलाच या सोहळ्याचे आयोजन झाले.
कंगणपूर तीर्थाचे प्रणेते आचार्य १०८ श्री जिनसेन मुनी महाराज यांच्या सानिध्यात सर्व विधी झाले. नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. कोलकाता येथील पारसकुमार पांड्या व गुणमाला पांड्या या दांपत्याला आदर्श दांपत्य म्हणून गौरवण्यात आले. त्यांच्या वतीने पीयुष पांड्या यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सकाळी सहाला मंगलवाद्यांचा घोष झाल्यानंतर सात वाजता ध्वजारोहण झाले. आठ वाजता भगवान चंद्रप्रभ तीर्थंकरांचा पंचामृत अभिषेक झाल्यानंतर नऊच्या सुमारास भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर मूर्तीला भामंडल अर्पण करण्यात आले. त्यानंतर श्री ज्वालामानिनी देवी अभिषेक व षोडशाभरण विधी झाला. दुपारी दोनपासून आदर्श दांपत्यांना पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी आचार्य १०८ श्री जिनसेन मुनी महाराज यांचे प्रवचन झाले. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी अक्षय तृतीयेचे महत्व सांगितले. नंदकुमार मोरे, रोहिणी पाटील, सुधीर मगदूम यांच्यासह मांगूर, रांगोळी, चिंचवाड येथील वीर सेवा दलांचे सत्कार झाले.
यावेळी जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे, माधव उपाध्ये, डी. ए. पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, सुरेश मगदूम, अंकिता पाटील, बाबूराव मगदूम आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर पाचच्या सुमारास मुख्य मस्तकाभिषेक सोहळ्याला प्रारंभ झाला. मुर्तीवर जल, नारळाचे पाणी, साखरेचे पाणी, उसाचा रस, आंब्याचा रस, दुध, दही, सर्व औषधींचा अभिषेक झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com