दागिणे लंपास

दागिणे लंपास

साडेचार तोळे दागिन्यांची चोरी

कोल्हापूरः सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमागे असलेल्या कॉलनीतील घरातून चोरट्याने सुमारे साडेचार तोळ्यांचे दागिने लंपास केले.
अंदाजे एक लाख २८ हजार रुपये त्याची किंमत होते. १५ जानेवारी ते दोन एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला. याची फिर्याद जान्हवी प्रवीण मस्कर यांनी शुक्रवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मस्कर या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमागे असलेल्या कॉलनीतील कुटुंबियांसह घरात राहतात. घरात वरच्या मजल्यावरील बेडरुममधील कपाटात त्यांनी सोन्याची मणीमाळ, चेन, कानातील टॉप्स, वेल असे सुमारे साडेचार तोळ्यांचे दागिने ठेवले होते. हे दागिने मिळत नसल्याचे त्यांना दोन एप्रिलला कळले. त्यानंतर याची माहिती कुटुंबियांना दिली. घरातील नातेवाईकांसह इतरांना दागिण्यांबाबत विचारले. मात्र दागिने सापडत नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
----

साळोखेनगर येथे वृद्धाची आत्महत्या

कोल्हापूरः साळोखेनगर येथील वृद्धाने शनिवारी राहत्या घरी आत्महत्या केली. यशवंत रामचंद्र पाटील (वय ८३) असे त्यांचे नाव आहे. छताच्या हुकाला त्यांनी गळफास घेतला. आज दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. हा प्रकार कुटुंबियांना कळताच त्यांनी पाटील यांना सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. पाटील हे कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
......

मधमाश्यांच्या हल्ल्यात बालक जखमी

कोल्हापूर : नातेवाईकांसोबत शेतात गेलेल्या तीन वर्षाच्या बालकावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने तो जखमी झाला. ध्रुव अजित कदम (वय ३) असे त्याचे नाव आहे. कणदूर (ता. शिराळा, जि. सांगली) येथे आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. जखमी ध्रुववर कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआरमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती स्थित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com