अंकासाठी शिवजयंती

अंकासाठी शिवजयंती

फोटो -
...

स्फूर्तीदायक शिवगीते अन् शिवछत्रपतींचा जयघोष

शिवकालीन युद्धकलेचा थरारः जल्लोषी वातावरणात शिवजयंती

कोल्हापूर, ता. २२ : स्फूर्तीदायक शिवगीते, लेझर शोचा झगमगाट व शिवछत्रपतींचा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात शिवजयंतीचा उत्साह आज टिपेला पोचला. हलगी, घुमकं व कैताळच्या ठेक्यावर महिलांनी लेझिमची प्रात्यक्षिके सादर करत शिवभक्तांची मने जिंकली. शिवकालीन युद्धकलेच्या थराराने उपस्थित भारावून गेले.
पारंपरिक पद्धतीने शिवजयंतीचा सोहळा शहर परिसरात आज झाला. गल्ली-बोळांत लावलेल्या भगव्या पताका व भगवे झेंडे यामुळे वातावरण शिवमय झाले होते. काल (ता. २१) रात्री जागून शिवभक्तांनी छोटे मंडप उभारले होते, तर ग्रामीण भागातील शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी किल्ले पन्हाळगडावर रवाना झाले होते.
सकाळी पोवाड्यांचे सूर वातावरणात स्वार होताच चौकाचौकांत उत्साह निर्माण झाला. हातात भगवे झेंडे, डोक्याला भगव्या पट्ट्या बांधून बालचमू शिवजयंतीसाठी सज्ज झाला.
दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेत महिला आल्या. त्यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या मिरवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकाची दुपारीच चाचणी झाली. दुपारी तीन वाजता मिरजकर तिकटी येथे शिवभक्तांची गर्दी झाली. मोठ्या आवाजाच्या ध्वनीक्षेपकावर गीते लावण्यात आली. मिरवणुकीसाठी मंडळे रांगेत आल्यानंतर आवाजाची तीव्रता अधिकच वाढली. पोलिस बंदोबस्तात मिरवणुका हळूहळू पुढे जाऊ लागल्या. उपनगरांतील बालचमूने सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. सायंकाळी त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन परिसरात फेऱ्या मारल्या.
----------

चौकट

मोठा पोलिस बंदोबस्त

यंदा एकामागोमाग एक मंडळांच्या मिरवणुका होत्या. त्यात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त होता. मिरजकर तिकटी येथे दुपारी तीनपासूनच पोलिस हजर होते. महाद्वार रोडवर मिरवणुका आल्यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो निवळला. त्यानंतरही कार्यकर्त्यांची धूसफूस सुरू असल्याचे चित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com