बसवेश्‍वर जयंती उत्साहात

बसवेश्‍वर जयंती उत्साहात

97856
...


शिव -बसव जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

वीरशैव समाजातर्फे आयोजन; महिलांचा सहभाग, लक्षवेधी प्रबोधन फलक


कोल्हापूर, ता. २२ : फुलांनी सजविलेली पालखी, बसवेश्वर अन्‌ छत्रपती शिवरायांचे आकर्षक पुतळे, ब्रासबँड पथक, झांजपथक, धनगरी ढोल, लेझीम पथक, बेंजो पथकाचा निनाद, छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहू महाराजांचा जयघोष अशा मंगलमय वातावरणात आज वीरशैव लिंगायत समाजातर्फे बसवेश्वर आणि शिवजयंती संयुक्तरित्या साजरी झाली.

दसरा चौकातील चित्रदुर्ग मठामध्ये सायंकाळी वीणा व बाळासाहेब साब्याण्णावर यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. आमदार जयश्री जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, वैशाली क्षीरसागर, शुभलक्ष्मी कोरे, पूजा पाटील, उमा बनछोडे यांच्या उपस्थित मिरवणुकीस प्रारंभ झाला. विविध पोस्टर्स, चित्ररथ, महिलांनी लाल रंगाच्या परिधान केलेल्या साड्या, पुरुषांनी केलेला सफेद रंगाचा शर्ट, महिला-पुरुषांनी फेटे बांधून मोठ्या संख्येने घेतलेला मिरवणुकीत सहभाग हे वैशिष्ट्य ठरले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, रंगीबेरंगी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.
दसरा चौक, फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज चौक, महापालिका, गवळी गल्ली, तेली गल्ली, बुरुड गल्ली, नष्टे गल्ली, शनिवार पोस्ट, टाऊन हॉल मार्गे पुन्हा चित्रदुर्ग मठात मिरवणूक आली. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी, सचिव राजू वाली, दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे, संजय बोधले, राजेश पाटील चंदूरकर, चंद्रकांत हळदे, डॉ. गिरीश कोरे, अॅड. सतीश खोतलांडे, नानासाहेब नष्टे, श्रीकांत बनछोडे, गुरुदेव स्वामी, चंद्रकांत नासीपुडे, राहुल नष्टे, मंदा कुलकर्णी, स्मिता हळदे, प्रेमा स्वामी, मीना सावर्डेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, सकाळी चित्रदुर्ग मठामध्ये धार्मिक विधी आणि अक्कमहादेवी वीरशैव महिला मंडळाचे भजन, संगीताचा कार्यक्रम झाला. सरिता व प्रदीप पांगे यांच्य हस्ते वरदशंकर महापूजा आणि रक्तदान शिबिर झाले. आमदार सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रतिमा पूजन केले. वस्त्रोद्योग समितीचे सदस्य चंद्रशेखर फडणीस यांचे ‘महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य’ यावर व्याख्यान झाले.

....

प्रबोधनात्मक लक्षवेधी फलक

-झाडांना करू नका नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट
-ठेवा साफसफाई परिसरात, हेच औषध सर्व रोगात
-प्लास्टिक दूर करूया, पर्यावरण वाचवू या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com