हृदयस्पर्श-पद्माकर कापसे सत्कार

हृदयस्पर्श-पद्माकर कापसे सत्कार

97855
कोल्हापूर ः येथील हृदयस्पर्श सोशल ॲंड कल्चरल फाउंडेशनचे प्रमुख पद्माकर कापसे यांचा शनिवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी वसंतराव मुळीक, राहूल चिकोडे, पद्मिनी कापसे, अशोक भोईटे आदी.

पद्माकर कापसे यांचा
एकसष्ठीनिमित्त सत्कार
रंगली ‘जिंदगी मिलकर बिताऐंगे‘ मैफलही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ ः येथील सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात पद्माकर कापसे यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. एकसष्ठीनंतरही त्यांनी आपले काम असेच सुरू ठेवावे, अशा भावना आज व्यक्त झाल्या. निमित्त होते, श्री. कापसे यांची एकसष्ठी आणि गेल्या चार दशकातील योगदानाबद्दल त्यांच्या सत्काराचे.
हृदयस्पर्श सोशल ॲंड कल्चरल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमाचे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने ‘जिंदगी मिलकर बिताऐंगे‘ ही मैफलही रंगली.
फाउंडेशनचा एकवीसावा वर्धापनदिनही या वेळी साजरा झाला. या व्यासपाठीच्या माध्यमातून गेल्या एकवीस वर्षात रसिकांना अनेक मोफत कार्यक्रमांची पर्वणी मिळाली. त्याशिवाय राज्य नाट्य स्पर्धेत अनेक हौशी कलाकारांना संधी मिळाली. त्यासाठी कापसे यांचा पुढाकार सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, कवी अशोक भोईटे, संजय पवार आदी उपस्थित होते. कॉमर्स कॉलेजच्या १९८१ सालच्या माजी विद्यार्थ्यांतर्फेही कापसे यांचा गौरव झाला. संजय शिंदे-नेसरीकर, तानाजी गुडाळे, महेश सहस्त्रबुध्दे, प्रमोद सावंत, सुनील शिंदे, संजय पाटील आदींनी संयोजन केले. मैफलीत अठरा कलाकारांचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com