आवश्‍यक पत्रके

आवश्‍यक पत्रके

कंत्राटीकरणाविरोधी जागृती संघर्ष मेळावा कामगार दिनी
कोल्हापूर, ता. २९ : कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे कंत्राटीकरणविरोधी जागृती संघर्ष मेळावा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनी १ मे रोजी सकाळी ११ वाजता संतराम पाटील सभागृह, श्रमिक कार्यालय, रिलायन्स मॉलजवळ, लक्ष्मीपुरीत होणार आहे.
सरकारी, निमसरकारी, सहकारी आणि खासगी क्षेत्रात कंत्राटी कामगार पद्धत वाढत आहे. अनेक कायम कामे कंत्राटी, रोजंदारी, ठोक मानधनावरील कामगारांकरवी करून घेतली जातात. अनेक कंपन्या कंत्राटी कामगारांवर चालवल्या जात असून कामगार कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. यामध्ये कंत्राटी कामगारांचे शोषण होत आहे. किमान वेतन, भविष्यनिर्वाह निधी, राज्य कामगार विमा योजनेचे संरक्षण अशा कायदेशीर बाबीपासून वंचित ठेवले जाते. यामुळे कायम कामगारांच्या संघटनांवरही परिणाम होत आहेत. कंत्राटी कामगारात जागृती होत आहे. हे लक्षात घेता आता कृती समितीने पुढाकार घेऊन संघर्ष चालवण्याचा विचार केला आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन अनिल लवेकर (शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना), अतुल दिघे (श्रमिक महासंघ, एक्टू), दिलीप जगताप (भारतीय कामगार कर्मचारी महासंघ), एस. बी. पाटील (आयटक), सुभाष जाधव (सिटू) यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...


आधी वेतन; मग संपात सहभाग
कामगारांची भावना; श्रमिक संघाचे एकजुटीचे आवाहन

कोल्हापूर, ता. २८ : रोजंदारी कामगारांत ‘मनपा’मधील नियोजित संपाबद्दल गोंधळाची भूमिका आहे. या संपाबद्दल श्रमिक कार्यालय झालेल्या रोजंदारी आणि ठोक मानधनावरील कामगारांच्या बैठकीत याबद्दलचे विचार कामगारांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या जुन्या पेन्शनच्या संपात रोजंदारी कामगारही सहभागी झाले. त्यांना जुनी पेन्शन लागू होत नाही; पण मान्यताप्राप्त संघटनेने सांगितल्याने ते सहभागी झाले. आता संप काळाचा कायम कामगारांचा पगार जमा होणार आहे. रोजंदारी कामगारांचे खाडे पडले आहेत. ‘ते वेतन आधी जमा करून द्या, मग पुढचा संप सांगा’, असे अनेक कामगारांनी मत व्यक्त केले. रोजंदारी कामगारांच्या प्रश्नावर मान्यताप्राप्त संघटना ठाम राहणार असेल आणि त्यांचे प्रश्न मिटल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असे जाहीर करणार असेल तरच संपात सहभागी होऊ, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. श्रमिक संघाचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, ‘‘कामगारांची जूट महत्त्वाची आहे. कंत्राटी आणि ठोक मानधानी कामगारांना डावलले जात आहे, अशी त्यांच्यात भावना आहे.’’ कामगारांची एकजूट झाली पाहिजे, त्यादृष्टीने दोन्ही संघटनांची एकजुटीची कृती समिती तयार करावी, असे आवाहन श्रमिक संघाने केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com