संक्षिप्त

संक्षिप्त

रिपब्लीकन सेनेतर्फे
आज मोटार रॅलीचे आयोजन
कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रिपब्लीकन सेनेतर्फे रविवारी (ता.३०) सायंकाळी चार वाजता भव्य मोटार रॅली होणार आहे. कळंबा फिल्टर हाऊसपासून रॅलीला प्रारंभ होणार आहे. नंगीवली तालीम, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ‘सीपीआर’मार्गे दसरा चौक येथे रॅलीची सांगता होईल.
-------------------
‘उत्कर्षा ग्रुप’तर्फे विविध वस्तूंचे प्रदर्शन
कोल्हापूर : उत्कर्षा ग्रुपतर्फे घरगुती महिला उद्योजकांसाठी मंथली मिनी मार्केट उपक्रमांतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. मंगलधाम येथे प्रदर्शन झाले. प्रदर्शनात विविध सरबत, सिरप, फणस गरे, गूळ, आरोग्यपूर्ण बिस्किटे, लोकरीच्या वस्तू, तोरण, हर्बल सौंदर्य प्रसाधने, चटण्या, इमिटेशन ज्वेलरी, मुखवास, सुपारी, लाडू व फराळाचे पदार्थ, वाळवणाचे पदार्थ, घराच्या भिंती साजवणाऱ्या, स्वागतासाठीच्या शोभिवंत वस्तूंचा प्रदर्शनात समावेश होता. उत्कर्षा ग्रुपच्या अध्यक्षा सायली मुनीश्वर, पूर्व गाडगीळ आदी उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com