गांजा विक्रेता अटक

गांजा विक्रेता अटक

फोटो नितीन देणार आहे.
------
गांजा विकणाऱ्या तिघांना अटक

एक लाख चाळीस हजार रुपयांचा गांजा जप्त

कोल्हापूर, ता. २९ ः गांजा विकणाऱ्या तिघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून १४ किलो ११४ ग्रॅम वजनाचा एक लाख चाळीस हजार रुपयांचा गांजा जप्त केला. यामध्ये एक सोलापूरचा तर दुसरा परप्रांतीय आहे. जुना राजवाडा पोलिसांनी ही कारवाई केली. योगेश भगवान गणेशाचार्य (वय २९, रा.चंबुखडी, शिंगणापूर ता. करवीर ), नितीन जगन्नाथ रायते (वय ४२, रा. गुरसाळे ता. माळशिरस जि. सोलापूर) आणि अलोक सुरेंद्र माजी (वय ४०, रा. लिटीगुडा संबलपूर, जि. गजपती, राज्य. ओडीशा ) अशी अटक केल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, योगेश गणेशाचार्य नावाची व्यक्ती फुलेवाडी नाका ते फुलेवाडी ६ वा बस थांब्यावर गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी गुन्हे शोध पथकाची पथके तयार करून फुलेवाडी नाका ते फुलेवाडी ६ वा बस स्टॉपदरम्यान सापळा लावला. तेथे एक व्यक्‍ती फुलेवाडी नाक्यावरून फुलेवाडी ६ वा बस थांब्याकडे पाटीवर सॅक अडकवून जात असल्याचे दिसून आले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण १० किलो ११४ ग्रॅम वजनाचा एक लाख रूपये किंमतीचा गांजा मिळाला. त्याने स्वतःचे नाव गणेशाचार्य असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गांजा कोठून आला याची माहिती घेतली असता त्याने अन्य दोघांची नावे सांगितली. तसेच ते मंगळवार पेठेतील एका यात्री निवासमध्ये असल्याचे सांगितले. त्यानुसार तेथे छापा टाकून नितीन रायते आणि अलोक माजी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपासणी केली असता त्यांच्याकडून ४ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक संदीप जाधव व त्यांचे पथक करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com