दर्जेदार रस्ते करणाऱ्यांनाच प्राधान्य द्या ः ॲड.बाबा इंदुलकर

दर्जेदार रस्ते करणाऱ्यांनाच प्राधान्य द्या ः ॲड.बाबा इंदुलकर

दर्जेदार रस्ते करणाऱ्यांनाच
प्राधान्य द्या : बाबा इंदुलकर
डांबर प्रकल्प कार्यान्वित करण्याचीही मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : महापालिका अंतर्गत येणाऱ्या रस्ते बांधणीसाठी राज्य शासनाने १०० कोटींचा निधी दिला आहे. मात्र हे रस्ते बांधण्याचे काम दर्जेदार रस्ते करणाऱ्यांनाच द्यावे. तसेच महापालिकेचा डांबर प्रकल्प कार्यान्वित करून त्याचा उपयोग बांधणीसाठी करावा. या प्रमूख मागण्यांसह अन्य मागण्यांचे निवेदन कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाबा इंदुलकर यांनी प्रशासकांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, शासनाने दिलेले शंभर कोटी रुपये रस्ते बांधणीवर खर्च करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना दर्जेदार रस्ते करण्याचा अनुभव आहे त्यांनाच कामे द्यावीत. ज्यांच्याकडून चांगल्या कामाचा अनुभव नाही त्यांना ठेका देऊ नये. या निधीतून कोणते रस्ते केले जाणार आहेत याची माहिती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी. रस्ते करण्यापूर्वी तेथील जलवाहिनी, ड्रेनेजची कामे आधी करून घ्यावीत. महापालिकेचा डांबर प्रकल्प कार्यान्वित करून त्याचा उपोग रस्ते बांधणीसाठी करावा. रस्ते बांधण्यापूर्वी तेथील स्थानिक नागरिकांची समिती बनवावी त्यामध्ये महिलांना स्थान द्यावे. या समितीतर्फे रस्ते कामाची देखरेख करावी. रस्ते बांधण्यापूर्वी पाऊस, वाहने यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन मग रस्ते करायला घ्यावेत. रस्ते अधिकाधीक टिकतील या दृष्टीने रस्ते बांधणी करावी. पावसाळा लक्षात घेऊन १५ मे नंतर रस्त्याचे काम हाती घेऊन नये तसेच डांबरीकरण करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com