भटक्या कुत्र

भटक्या कुत्र

निर्बिजीकरण केंद्रात
भटक्या कुत्र्याचा मृत्यू

कोल्हापूर ः महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमधील भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण केंद्रात शस्त्रक्रिया केलेल्या एका भटक्या कुत्र्याचा मृत्यू झाला. जखम पूर्ण भरण्याआधीच त्याला सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे ॲड. रमेश बदी यांचे म्हणणे आहे.
याबाबत ॲड. बदी यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया केल्यानंतर टाके वाळण्याआधी त्या कुत्र्याला सोडले. त्यानंतर त्याची जखम बळावून त्यातून ते मृत झाले. त्याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच शवविच्छेदनासाठी शासनाच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील कार्यवाही करू. दरम्यान, महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतर कुत्र्याला सात दिवस ठेवले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतरच त्याला सोडले होते असे सांगितले. शवविच्छेदन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी बदी यांच्यासोबत प्राणीप्रेमी रात्री दवाखान्यात उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com