
पोलीस भरती
12839, 12841, 12843, 12845
पाडळी खुर्दच्या चार तरुणांचे
मुंबई पोलिस भरतीत यश
बालिंगा, ता. २८: सातत्यपूर्ण अभ्यास आणि मैदानी खेळांचा न चुकता केलेला सरावाच्या जोरावर मुंबई पोलिस भरतीमध्ये पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील चार तरुण यशस्वी झाले आहेत.
विपुल विलास तानगडे, युवराज दादासाहेब पाटील, सुरज उत्तम टोणपे आणि अनिकेत शहाजी पाटील या तरुणांचा समावेश आहे.
युवराज, अनिकेत यांचे वडील शेती करतात. विपुलचे वडिल पोलिस होते. तर, सुरजचे वडिल हे सेट्रिंगचे काम करतात. चारही तरुणांनी कोरोना दरम्यान मैदानी खेळावर कष्ट घेतले. त्यामुळे पोलिस भरतीमध्ये त्यांना याचा चांगला फायदा झाला. युवराज पाटील म्हणाला, ‘वडिल शेती करतात. तरीही मैदानी खेळावर लक्ष दिले. त्यासाठी आवश्यक अभ्यासही केला. पाडळी खुर्दमधील अनेक तरुण पोलिस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांना चांगले वाचनालय आणि खेळाचे मैदान हवे आहे.’
विपुल तानुगडे म्हणाला, ‘घरातुनच पोलिस क्षेत्राचा अनुभव वडीलांकडून भेटल्याने लहानपणापासूनच पोलिस होण्याचे मार्गदर्शन मिळाले. मैदानी चाचणीत अव्वल होतो. लेखी परीक्षेसाठी मेहनत घ्यावी लागली.’
सुरज टोणपे म्हणाला, ‘वडील सेटिंगचे काम करतात. प्रतिकुल परिस्थितीत वडीलाना मदत म्हणून इलेक्ट्रिशनचे काम करत पोलिस होण्याचे स्वप्न बाळगले. मैदानी चाचणीत अव्वल होताच त्यामुळे होमगार्डमध्येही सेवा बजावली.’
अनिकेत पाटील म्हणाला, ‘वडील शेती करतात. लहानपणापासूनच खेळाडू वृत्ती आणि खाकी वर्दीचे आकर्षण होते. म्हणुनच होमगार्ड सेवा बजावली. सतत मैदानी सराव व अभ्यासाची सांगड घालत हे यश मिळावले आहे.’ चौघांच्याही यशात त्यांचे आई-वडील आणि त्यांचे कुटुंबीय यांचा मोलाचा वाटा आहे. त्यासह कोल्हापूर पोलिस सतिश तानुगडे व परिक्षेसाठी सचिन इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.