युथ समिट ऑफ समर अधिवेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युथ समिट ऑफ समर अधिवेशन
युथ समिट ऑफ समर अधिवेशन

युथ समिट ऑफ समर अधिवेशन

sakal_logo
By

‘यिन’ लोगोसहित

05428
कोल्हापूर : भरतनाट्यम्‌ सादर करताना पहिल्या छायाचित्रात अनुक्रमे अमृता पवार, शांभवी पुरेकर, स्वरा कुलकर्णी.
(सर्व छायाचित्रे : बी. डी. चेचर)


05346
सुमीत पाटील (डिजिटल क्रिएटर)

कंटेंट निर्मितीस वाव : सुमीत पाटील
आताचं जग सोशल मीडियाने पूर्णपणे व्यापलं आहे. अशा काळात डिजिटल क्रिएटरला अनन्यसाधारण महत्त्व आलेले पाहायला मिळतं, असे प्रतिपादन डिजिटल क्रिएटर सुमीत पाटील यांनी केले. ते म्हणाले, ‘‘२०१३ मध्ये एक व्हिडिओ डबिंग केला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. भारी वाटलं. मुळात त्या काळात व्हायरल म्हणजे काय? व्हिडिओ कसा तयार करायचा, हे सर्व काही नवीन होतं. आता मात्र परिस्थिती तशी नाही. अनेक व्हिडिओज्‌, रिल्स्‌ तयार होऊ लागले आहेत. यासाठी लागणारा कंटेट खूप आवश्‍यक असतो. कंटेट उत्कृष्ट असेल तर लोक ते आवर्जून पाहतात. कंटेट तयार करायला आता वाव आहे. यासाठी ज्यांच्याकडे कंटेट तयार करण्याची क्षमता आहे, त्यांना कंटेट क्रिएटर म्हणून कामे मिळतात. पैसे मिळतात.’’ ते म्हणाले, ‘‘कोणताही कंटेट व्हिडिओ, रिल्स्‌ तुम्ही सहजपणे अपलोड करू शकता. लोक ते पाहतात. कोणतीही गोष्ट व्हायरल करणं आपल्या हातात नसते. ज्यांना कंटेंट आवडेल तेच लोक पाहतील; अन्यथा तुमच्या व्हिडिओ बाजूला पडून दुसरा चांगला व्हिडिओ पाहतील. कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्याकडे स्ट्रॉंग कंटेट असेल तरच तो लोकांपर्यंत पोचतो.’’
...

05359 - ऋषीकेश गोडबोले (आर्थिक सल्लागार)

आर्थिक साक्षर व्हा : गोडबोले
पैसा सगळ्यांना आवडतो. पैसा आपल्या हातात भरपूर असायला हवा, असे अनेकांना वाटते. पैसा कोणत्याही माध्यमातून मिळवायला सर्वांनाच आवडतो; पण तो कसा मिळवायचा, पैसा हाती आला तर नेमके कसे करायचे, याचे ज्ञान अनेकांना नसते. यासाठी प्रत्येक जण आर्थिक साक्षर (फायनान्सियल लिटरशी) असणे आवश्‍यक असते, असा सल्ला आर्थिक सल्लागार ऋषीकेश गोडबोले यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘पैशांचे महत्त्व आयुष्यात अपार आहे. पैसा असेल तर सर्व गोष्टी तुम्हाला करता येतील. पैसा कोणत्या माध्यमातून गुंतवायचा? त्या गुंतवणुकीतून येणारा परतावा, पैशांचे व्यवस्थापन लहान वयापासून प्रत्येकाने शिकले पाहिजे. पैसा गुंतविण्याचे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत; पण चुकीच्या माध्यमातून पैसा गुंतविणे धोक्याचे ठरू शकते. बचत करणे, इमर्जन्सी फंड तयार करणे, बजेटिंग करणे आवश्‍यक ठरते. यासाठी पहिल्यांदा तुम्ही गुंतवणुकीसाठी लागणारे ज्ञान अपडेट करा. वाचन करा. मार्केटवर लक्ष ठेवा. संशोधन करा; मग ठरवा, कोणत्या माध्यमातून पैसा गुंतवायचा आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून आर्थिक साक्षरता अंगी बाणवली तर आयुष्य सुखाचे जाते. पैसा असला तरी, आला तरी आर्थिक शिस्त महत्त्वाची ठरते, हे लक्षात ठेवा.
...


05361
राजकुमार पाटील (संचालक, विद्याप्रबोधिनी)

स्पर्धा परीक्षांसाठी लहानपणापासून
तयारी करा : राजकुमार पाटील
तुम्हाला यूपीएससी, एमपीएससीमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर शाळेपासून अभ्यासाची सवय लावून घ्या. स्पर्धा परीक्षांची तयारी ही लहानपणापासूनच करायला हवी. हा अभ्यासच तुमच्या एमपीएससी/यूपीएससीतील यशाला कारणीभूत ठरू शकतो, असा सल्ला विद्याप्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘या परीक्षेत एकदा का तुम्ही यशस्वी झालात, की मग तुम्हाला शासनाच्या प्रशासकीय सेवेत प्रवेश करता येतो. आयुष्यभर तुम्हाला तेथून बाहेर काढण्याची ताकद कुणाकडेही नाही. तुम्ही प्रशासकीय सेवेत गेलात की, समाजसेवेची प्रेरणा मात्र जिवंत ठेवा. प्रशासकीय सेवेमुळे तुम्हाला आयुष्यभर आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. तुम्हाला प्रशासकीय सेवेत का यायचे आहे, याचे कारण तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणे गरजेचे आहे. कारण माहीत नसेल तर उपयोग काहीच होणार नाही. आयुष्यात संधी प्रत्येक टप्प्यावर येत असते. अशीच संधी स्पर्धा परीक्षांतही येते. ही संधी घेण्यासाठी तुम्हाला कसोशीने अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. ‘यूपीएससी-एमपीएससी’ची तयारी आता स्थानिक पातळीवर करण्याची सोय झाली आहे. यासाठी मुंबई, पुणे, दिल्लीत जाण्याची गरज नाही. एक तत्त्व लक्षात ठेवा, ‘फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन, बट लास्टिंग इम्प्रेशन इज इम्पॉर्टंट.’
...


05364
समीटमध्ये विद्यार्थांशी चर्चा.

तेजोनिधी भंडारे (सीईओ, रिलायन्स ॲनिमेशन)/ संतोष रासकर (संचालक, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन)

संयम, सराव, आवड, चिकाटी
महत्त्वाची : तेजोनिधी भंडारे
ॲनिमेशन सर्व वयोगटांतील लोकांना आवडते. ॲनिमेशन हा उद्योग जगभरात विकसित झाला असून, या क्षेत्रात प्रचंड संधी आज उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती रिलायन्स ॲनिमेशनचे ‘सीईओ’ तेजोनिधी भंडारे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ॲनिमेशन म्हणजे, फक्त कार्टून नव्हे, तर व्हीएफएक्स तंत्रज्ञान, कॅरेक्टर स्क्रिप्टिंग, कलर कॉम्बिनेशन, प्रोसेसिंग अशा अनेकानेक संधी तुम्ही घेऊ शकता. यासाठी लागणारी दक्षता मात्र तुमच्याकडे हवी. या ॲनिमेशन उद्योगात तुम्ही करिअर करू शकता. संयम, सराव, आवड, चिकाटी हे गुण तुमच्याकडे हवेत; मग तुम्ही यशस्वी करिअर करू शकता.’’

डिजिटल डिझाईन करिअरमध्ये
नानाविध संधी : संतोष रासकर
शिक्षण घेत असताना, शिक्षण पूर्ण झाल्यावर कोणताही निर्णय घेताना शक्यतांचा विचार करणे आवश्‍यक आहे; कारण शक्यतांचा विचार केला नाही तर आयुष्य, पिढी वाया जाण्याचा धोका असतो. हा धोका तुम्ही पत्करू नका, असा सल्ला सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संचालक संतोष रासकर यांनी दिला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही जे आता शिकत आहात, त्याचा भविष्यात कसा फायदा होईल, पैसे कसे मिळतील, हा विचार आताच करायला शिका, तेव्हाच यशाची सुरुवात होईल. शक्यतांचा विचार आहे, म्हणूनच जगात अनेक शोध लागले. दर दहा वर्षांनी करिअर बदलत असते. यासाठी तुम्ही करिअरबाबत सीरियस आहात का? म्हणून सांगतो, डिजिटल डिझाईन करिअरमध्ये अतोनात संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संधी स्वीकारायला उशीर करू नका. डिझाईन क्षेत्रात नवनिर्मितीची संधी आहे. खात्रीशीर रोजगार मिळणार आहे. यासाठी लवकर शिक्षण पूर्ण करा. पैसा कमवा. कामगार व्हायचे नसेल तर अनुभव वाढवा.’’
...


हा फोटो मोठा वापरणे.

05366
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मुलाखत घेताना ‘यिन’ संपादक संदीप काळे.

राष्ट्रकुल कुस्ती ॲकॅडमीची उभारणी सुरू : चंद्रहार पाटील
ाघरातील वातावरण जसं कुस्तीचं होतं, तसंच शिक्षणाचंही होतं; पण वडिलांनी कुस्तीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं. पलूसमधील शाळेत १९९५ मध्ये सातवीत असताना कुस्तीला सुरुवात केली; मात्र खेळाडू म्हणून महाविद्यालयीन जीवन अनुभवता आलं नाही. कुस्तीसाठी अफाट मेहनत लागते, मगच फळ मिळते, असे प्रतिपादन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केले. ते म्हणाले, ‘‘मला राम सारंग, श्रीपतराव आंदळकर, रुस्तूम-ए-हिंद हरिश्‍चंद्र बिराजदार ही देवमाणसं भेटली. गुरू भेटले. मेहनतीने, कष्टाने, गुरूंनी सांगितलेल्या तत्त्वानुसार दोन वेळेला महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. क्रिकेट किंवा अन्य खेळात पैसा, प्रसिद्धी खूप असते. कुस्तीला आताही चांगले दिवस आलेले आहेत. नवीन पिढी कुस्तीत तयार होत आहे. पुढील काळात जो कोण महाराष्ट्र केसरी मिळवेल, त्यांना मी वैयक्तिक एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा संकल्प केला आहे; कारण एक कुस्तीपटू तयार होताना खर्च हा खूप असतो. सांगली जिल्ह्यातील माझ्या गावी राष्ट्रकुल कुस्ती ॲकॅडमी उभी करण्यास सुरुवात झाली. २२ कोटी रुपयांचा हा आराखडा आहे. इथे कुस्तींच्या सर्व सुविधा, शिक्षण, अन्य गोष्टी असणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त हे कुस्ती सेंटर असेल. यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, बैलगाडी शर्यती असे उपक्रम सुरू केले आहेत. कुस्तीत यायचे असेल तर कष्टाची तयारी हवी. नक्कीच तुम्ही यात यशस्वी व्हाल.’’
...

05374 - प्रा. आम्रपाली चव्हाण

शिक्षण क्षेत्रातील संधींचा
वापर करा : प्रा. आम्रपाली चव्हाण
आर्टिफिशियल इंटिलिजन्स्‌, सोशल मीडियामुळे प्रचंड डेटाची उत्पत्ती होऊ लागली आहे. हा डेटा कसा वापरायचा, याचे आव्हान अनेक कंपन्यांसमोर आहे. यासाठी लागणारी डेटा कौशल्ये आताच्या विद्यार्थ्यांकडे असली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. आम्रपाली चव्हाण यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘‘हा डेटा आता टेराबाईट, पेटाबाईटपर्यंत पोचला आहे. म्हणून आमच्या पुण्यातील ‘एआयएसएसएमएस’ सेंटरतर्फे आताच्या काळात लागणारे सर्व कौशल्याधारित कोर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. हे कोर्स पूर्ण केल्यावर नक्कीच नोकरी मिळेल. चांगले पैसे मिळतील. सोशल मीडियाचा, ॲन्ड्रॉईड फोनचा तुम्ही वापर करीत आहात; पण ॲलर्ट राहा. कुणाच्याही आहारी जाऊ नका. मार्केटच्या मागणीनुसार नवीन कौशल्याधारित अभ्यासक्रम शिका. नक्कीच फायदा होईल. कमी माणसे, काम कमी, पैसे जास्त, कौशल्ये जास्त अशा क्षेत्रात आता संधी अफाट आहेत. फायनान्सियल मॅनेजमेंट, स्टार्टअपमध्ये संधी आहेत. पैसे, पॅकेज मिळवून देणारे कितीतरी कोर्स आहेत, त्यांचा अभ्यास करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शिक्षण क्षेत्रातील संधींचा उपयोग करून घ्या.
...

05388
निखिल पंडितराव (कार्यकारी संपादक, ‘सकाळ’ कोल्हापूर)

छोट्या गोष्टीतून यशाकडे मार्गस्थ व्हा : निखिल पंडितराव
जीवनातील अंतिम सत्य हा आनंद असतो. हाच आनंद देण्याचे काम ‘लाइफ इन बॅलन्स’मधून होते. स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन करा, मग हे परिवर्तन समाजात होईल, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी केले. ते म्हणाले, ‘‘स्वत:वर श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास ठेवा. मी करू शकतो, असा आत्मविश्‍वास स्वत:जवळ येऊ द्या. सेल्फ कॉन्फीडन्स वाढेल. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या; जबाबदारी स्वीकारायला शिका. कामात यश येईल. ज्या समाजात वावरतो, त्या समाजाचं काही देणं आहे, ही मूल्ये जवळ बाळगा. यासाठी तुम्ही पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी एखादे झाड परिसरात लावा. पाण्याचा बेसुमार वापर करू नका. पाण्याची बचत करा. कोणत्याही कामाबाबत, एखाद्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करायला शिका. तुमचं हे वर्तन सकारात्मकतेकडे घेऊन जाईल. हे साध्य करायचे असेल तर ज्ञान पाहिजे. वर्तमानकाळात जगा. अभ्यास करा. वाचनाने ज्ञान येईल. ॲक्टिव्ह रीडिंगचा वापर करा. वेळेचे नियोजन आणि एकाग्रता असेल तरच कोणतेही काम अचूक होते. ही एकाग्रता साधण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा व टप्प्याटप्प्याने यशाकडे वाटचाल करा.’’


05396
राहुल पापळ (व्यवस्थापकीय संचालक, आर. एस. पापळ ग्रुप, लाडाची कुल्फी, पुणे)

मार्केट स्पेसमध्ये मला
कुल्फी दिसली : राहुल पापळ
सुरुवातीला सेल्समन म्हणून कामाला सुरुवात केली. कुणाचेही शिक्षण बघू नका, तो काय काम करतो, रिझल्ट देतो का, हे पाहा. आपल्याकडे काहीतरी स्किल्स आहेत, काही प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकू शकू, हा माझा आत्मविश्‍वास होता. भले फारसा शिकलो नाही, पण प्रॅक्टिकल आयुष्यात जे धडे घेतले, ते मला पुढे उपयोगी पडले, असे प्रतिपादन आर. एस. पापळ ग्रुप, लाडाची कुल्फीचे (पुणे) व्यवस्थापकीय संचालक राहुल पापळ यांनी केले. ते म्हणाले, ‘‘आईने सांगितले, राहुल तू जे करशील ते चांगलेच करशील. पुढे जाशील, हा मंत्र दिला. विनाकारण कुठलाही खर्च केला नाही. पैशांचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे. काय खाल्ले पाहिजे, हेही कळायला हवे. आपण एखाद्यासाठी १३ कोटींचा सेल करू शकतो, मग स्वत:चे प्रॉडक्ट काढले तर, हा विचार माझ्या मनात आला. स्वत:साठी तरी पाच कोटींपर्यंत सेल करू शकू, हा विश्‍वास होता. मी कोणत्या सेगमेंटमध्ये जावे, हा विचार केला. मार्केटची स्पेस ओळखता आली पाहिजे. कुल्फी लाँच करताना मी ग्लोबल विचार केला. मार्केट स्पेसमध्ये मला कुल्फी दिसली, आणि मी उद्योगात आलो. सलग पाच वर्षे मी कुल्फीवर अभ्यास केला. ‘इंडियाज लार्जेस्ट चेन आउटलेट ऑफ कुल्फी’ ही माझ्या उद्योगाची टॅगलाईन आहे. महाराष्ट्रात ४९० फ्रँचाईज कुल्फीच्या आहेत. माझ्या मेलवर २२०० फ्रँचाईझी द्यायच्या आहेत. गुजरात आईस्क्रीमचे माहेरघर आहे; पण एकट्या गुजरातमधून ३०० जणांनी कुल्फीबद्दल विचारणा केली आहे. हा मराठी कुल्फी ब्रँड आम्ही यशस्वी केला.
...

05399
डॉ. विजयकुमार यादव (जीवनरेखा प्रतिष्ठान)

व्यसनांपासून दूर राहा : डॉ. यादव
जीवनरेखा प्रतिष्ठान संस्थेची सुरुवात १९९३ मध्ये केली. संस्थेने अनेक क्षेत्रांत मराठवाड्यात काम केले, अशी माहिती जीवनरेखा प्रतिष्ठानचे डॉ. विजयकुमार यादव यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘अवर्षणग्रस्त खेड्यांमध्ये पाण्याचे शेड उभे केले. त्याचवेळी २००० मध्ये व्यसनमुक्तीसंदर्भात कामाला सुरुवात केली. मला पूर्वीपासून सामाजिक कामाची आवड होती. शैक्षणिक कामातून जे पैसे मिळत असत, ते सामाजिक कामासाठी वापरले. तरुणांचा देश आहे. त्यांचा समाजासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे. आज तरुण व्यसनांच्या आहारी गेला आहे. कौशल्य विकासात का यशस्वी होत नाहीत, याचा विचार सध्याच्या तरुणांनी केला पाहिजे. कौशल्यामुळे रोजगार उपलब्ध होतो. काही सामाजिक कामही करू शकतो. आतापर्यंत आम्ही ४० हजार तरुणांना व्यसनातून मुक्त केले. तरुणांचा काय उपयोग होईल, हा विचार करायला पाहिजे. व्यसन हे देशाच्या विकासासाठी घातक आहे. या व्यसनांपासून दूर झाल्याशिवाय प्रगती होणार नाही.
...


05405
डिम्पल गजवाणी (योग व ध्यान प्रशिक्षिका)

योगसाधनेला महत्त्व द्या : गजवाणी
तुम्ही युवा आहात. जीवनात काही तरी ध्येय असले पाहिजे. असे ध्येय साध्य करताना काही अडचणी येतात. ऊर्जा, एकाग्रता, फोकस, कॉन्फीडन्स मिळत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला आत सापडतील. म्हणून वर्तमानकाळात जगायचे असेल तर दररोज योगसाधना करावी लागेल, असे प्रतिपादन योग व ध्यान प्रशिक्षिका डिम्पल गजवाणी यांनी केले. त्या म्हणाल्या, ‘‘योगसाधनेचे महत्त्व खूप आहे. योगसाधना दररोज करावी लागेल. कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना दिवसभर ‘फ्रेश’ राहण्यासाठी दररोज सूर्योदयावेळी योगसाधना केली पाहिजे. तरच आपले शरीर, मन ताजेतवाने राहील. तुम्हाला कामासाठी ऊर्जा मिळेल; मग तुम्ही आयुष्यभर आरोग्यदायी राहाल.’’