चर्मकार आयोग लवकर स्थापन करा, अन्यथा तीव्र आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चर्मकार आयोग लवकर स्थापन करा,  अन्यथा तीव्र आंदोलन
चर्मकार आयोग लवकर स्थापन करा, अन्यथा तीव्र आंदोलन

चर्मकार आयोग लवकर स्थापन करा, अन्यथा तीव्र आंदोलन

sakal_logo
By

05641


चर्मकार आयोग स्थापन न केल्यास आंदोलन
महासंघाच्या मेळाव्यात इशारा; संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार

कोल्हापूर, ता. २८ ः राज्य सरकारने चर्मकार आयोग लवकर स्थापन करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मेळाव्यात रविवारी समाजबांधवांनी दिला. समाजाच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी संघटीतपणे लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला.
महासंघातर्फे सुभाषनगर येथील संत रोहिदास महाराज मंदिरात मेळावा झाला. त्यासाठी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव ज्ञानेश्वर कांबळे प्रमुख उपस्थित होते. चर्मकार उद्योगासाठी कमी व्‍याजाने कर्ज पुरवठा व्‍हावा. कारागीरांना पेन्‍शन लागू करण्यात यावी, आदी विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत सकारात्मक कार्यवाही करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मेळाव्यात समाजबांधवांनी दिला. मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देण्यासाठी संघटित होवून ताकद वाढविण्याचे आवाहन महासचिव कांबळे यांनी केले. शशिकांत सोनवणे, संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पोवार, माजी उपमहापौर भूपाल शेटे, देवी इंदुमती बोर्डिंगचे अध्यक्ष दुर्वास कदम यांनी मार्गदर्शन केले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव सातपुते, उपाध्‍यक्ष अरुण कुराडे, रामभाऊ कोरे, निलेश हंकारे, डॉ. हरिष नांगरे, सनी साळे, अजय डोईफोडे, राजाभाऊ मालेकर, संतोष बिसुरे, रवि सातपुते, आनंदा चव्हाण आदी उपस्थित होते.

मेळाव्यातील इतर मागण्या
*चर्मकार समाजाच्‍या उद्योगासाठी लागणारा कच्‍चा माल शासनाने पुरवावा
*अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या धर्तीवर लेदर टेक्‍नॉलॉजी पदवी अभ्‍यासक्रम सुरु करावा
*राष्ट्रीयकृत बँकांनी सरकारी नोकर जामीन अट रद्द करून त्वरित कर्जपुरवठा करावा.