
ऋतूराज पाटील- आरोग्य शिबिर
05794
निरोगी आयुष्यासाठी वेळीच
उपचार घ्या ः ऋतुराज पाटील
प्रतिभानगर येथे मोफत आरोग्य शिबिर
कोल्हापूर, ता. २९ ः आरोग्य चांगले असेल तर आपण सक्षमपणे आयुष्य जगू शकतो. निरोगी आरोग्य ही सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे एखाद्या आजाराकडे दुर्लक्ष करण्याऐवजी नागरिकांनी वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिभानगर येथे मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. चारशेहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. दरम्यान, शिबिरात विविध चाचण्या करण्यात आल्या. पुढील उपचारासाठी त्यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये मोफत सुविधा देण्यात येणार आहेत.
सुरेश ढोणुक्षे, अनिल घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. महेश कोरवी, उमेश पवार, अनिल कलकुटकी, जितेंद्र ढोबळे, सर्जेराव साळोखे, समीर कुलकर्णी, श्रीधर गोजारे, स्वप्नील रजपूत, संदीप पाटील, काकासाहेब पाटील उपस्थित होते. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे डॉ. प्रताप वरुटे, डॉ. सोनल गोवारीकर, डॉ. वृष्टी जैन आदींनी तपासणी केली.