पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Published on

जिल्हाधिकाऱ्यांना
अहिल्यादेवी होळकर
यांची प्रतिमा भेट

कोल्हापूर, ता. ३० : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा नाही. या पार्श्वभूमीवर आणि पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीचे औचित्य साधून मल्हार सेनेच्या वतीने प्रत्येक कार्यालयामध्ये अहिल्यादेवी यांची प्रतिमा प्रदान करण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना आमदार ऋतुराज पाटील व मल्हार सेना सरसेनापती बबनराव रानगे यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच, सर्व शासकीय कार्यालयात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीदिनी पूजन होऊन त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्याचा प्रसार करावा. त्यांचा विचार आणि कर्तृत्व आत्मसात केल्यास सर्वसामान्य जनतेला निश्चित न्याय मिळेल, असे रानगे यांनी सांगितले. यावेळी वसंतराव मुळीक. डी जे भास्कर, राघु हजारे, छगन नांगरे, बाबुराव बोडके, बबलु फाले, दता बोडके, हेमंत बोडके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur univercity
Baramati Event: Maharashtra Minister Announces Key Conditions for Farmers' Loan Waiver
sakal
solapur univercity
Marathi News Esakal
www.esakal.com