सकाळ नाट्य महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ नाट्य महोत्सव
सकाळ नाट्य महोत्सव

सकाळ नाट्य महोत्सव

sakal_logo
By

पडदा, पोस्टर फोटो आजच्या बातमीतून
..............
तिकिटे उद्यापासून नाट्यगृहावर उपलब्ध
सकाळ नाट्य महोत्सव; सलग तीन दिवस लोकप्रिय नाटकांचा आविष्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : दर्जेदार नाटकांसाठी आसुसलेल्या कोल्हापूरकरांसाठी सहा ते आठ जूनदरम्यान सकाळ नाट्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद घेण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी तिकिटांवर भरघोस सवलत दिली असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रोज रात्री साडेनऊ वाजता महोत्सव होणार आहे. नाट्यगृहावर गुरुवार (ता. १) पासून तिकिटे उपलब्ध होणार आहेत. वैविध्यपूर्ण विषयांवरील तीन दर्जेदार नाटके या महोत्सवात रसिकांना पाहता येणार आहेत. महोत्सवाचे मुख्य प्रायोजक चितळे डेअरी आणि सहयोगी प्रायोजक तनिष्क ज्वेलर्स व यशवंत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड (फलटण), माई ह्युंडाई, दि शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (तळमावले, सातारा) हे आहेत.
दरम्यान, प्रशांत दामले, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील सेलिब्रिटींचा नाट्याविष्कार यानिमित्ताने सजणार आहे. त्याशिवाय त्यांच्याशी संवादही साधता येणार आहे. सध्याच्या व्यावसायिक रंगभूमीवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या नाटकांचा महोत्सवात समावेश आहे. साहजिकच, ही एक वेगळी पर्वणी कोल्हापूरकरांना अनुभवता येणार आहे.
------------
चौकट
महोत्सवाचे तपशील असे
कधी : ६ ते ८ जून
केव्हा : दररोज रात्री ९.३० वाजता
कुठे : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर
----
चौकट
महोत्सवाचे वेळापत्रक
मंगळवार (ता. ६) : ‘तू तू मी मी’
बुधवार (ता. ७) : ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
गुरुवार (ता. ८ ) : ‘नियम व अटी लागू’
..........
चौकट
तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती रुपये)
संपूर्ण महोत्सवाचे तिकीट (तळमजला) : १२००
प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

चौकट
असे बुकिंग करा तिकीट
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची दैनंदिन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकिटे ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळासह फोन बुकिंगवर उपलब्ध आहेत. ९५६१६२६६६५ या क्रमांकावर संपर्क साधूनही तिकिटे आरक्षित करता येतील. त्याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृह, चितळे एक्स्प्रेस (राजारामपुरी) येथेही गुरुवार (ता. १) पासून तिकिटे उपलब्ध होणार आहेत.
....
कोट
05946
‘तू तू मी मी’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आल्यानंतर त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ’च्या पुण्यातील नाट्य महोत्सवातही या नाटकाला प्रेक्षकांनी उदंड गर्दी केली. आता हाच महोत्सव कोल्हापूर, सांगली, कराड येथे होत असून, प्रेक्षक नक्कीच या प्रयोगालाच नव्हे तर संपूर्ण महोत्सवाला मोठी गर्दी करतील, असा विश्वास नक्कीच आहे.
- भरत जाधव, अभिनेता