
बांधकाम कायमस्वरूपी बंद करा
सुशोभिकरणाचे काम कायमस्वरूपी बंद करा
इचलकरंजी मराठे मिल कॉर्नर परिसरातील नागरिकांची मागणी
इचलकरंजी, ता. ३१ : येथील मराठे मिल कॉर्नर येथे मुख्य रस्त्यावर मध्यभागी सुशोभिकरणाच्या नावाखाली होत असलेल्या बांधकामामुळे परिसरातील रहिवाशी, व्यावसायिक व वाहतुकदारांना त्रास होणार आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबवून कायमस्वरूपी बंद करावे, अशी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना दिले.
परिसरात धान्य लाईन ही व्यापारी पेठ आहे. येथे सतत मोठ-मोठे ट्रक या रस्त्यावर परिसरामध्ये उभारलेले असतात. या मार्गावरून वाहनांची व नागरिकांची रेलचेल सुरू असते. तसेच येथे फार पूर्वीपासून रिक्षास्टॉपही आहे. अनेक लहान मोठी व्यापारी आस्थापने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मध्यभागी सातत्याने वाहनांचे पार्किंग केलेले असते. या सर्व परिस्थितीमुळे येथे अनेकदा अपघात घडलेले आहेत. त्यामुळे येथे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत. अशी परिस्थिती असताना सुशोभिकरणाच्या नावाखाली करण्यात येत असलेल्या बांधकामामुळे या परिसरातील व्यावसायिक, नागरिक व अन्य पादचारी व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून हे सुशोभिकरण थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देतेवेळी दत्तात्रय सुतार, ऋषिकेश सुतार, प्रशांत सुतार, संतोष पवार, कुणाल थोरात, संतोष कुंभार, प्रवीण जाधव, प्रथमेश भोने, वैभव चव्हाण, विनायक सुतार आदी उपस्थीत होते.