डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स कंपनी निवड

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स कंपनी निवड

ich316.jpg
06158
इचलकरंजी ः डीकेटीई टेक्स्टाईल विभागातील रिलायन्स कंपनीत १४ विद्यार्थी - विद्यार्थीनींची निवड झाली.

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स कंपनीत निवड
इचलकरंजी, ता. १ : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील १४ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत रिलायन्स कंपनीमध्ये निवड झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विविध पदावर हे विद्यार्थी रुजू होणार आहेत.
रिलायन्स कंपनी टेक्स्टाईल आणि पॉलिस्टर उत्पादनात देशभरात अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते. ती एनर्जी, रिटेल्स, मटेरियल्स, इंटरटेनमेंट आणि डिजीटल सर्व्हिसेस अशा नवनवीन क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. रिटन टेस्ट, पर्सनल इंटरव्हयू अशा अनेक फेऱ्यामधून विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमतांची चाचणी घेतली. त्यामधून विद्यार्थ्यांची निवड केली. त्यांची नाव अशी, उत्तम मगदूम, विनय बुगड, रविराज खोत, कल्याणी टेंबुर्णे, गणेश मनवाडे, प्रथमेश पाटील, आकाश हसबे, आकाश सिंग, किरण भाकरे, धनंजय दातार, ज्ञानेश्‍वर खोत, सियाराम विश्‍वकर्मा, प्रथमेश इंगवले, यश जाधव. या निवडीमध्ये टेक्स्टाईल विभागाचे टीपीओ प्रो. एस. बी. अकीवाटे यांचा मोलाचा वाटा आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे आदिंनी अभिनंदन केले. संस्थेच्या प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com