दिव्यांग राखीव निधीचा लाभ घ्या : स्वरुप खारगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग राखीव निधीचा लाभ घ्या : स्वरुप खारगे
दिव्यांग राखीव निधीचा लाभ घ्या : स्वरुप खारगे

दिव्यांग राखीव निधीचा लाभ घ्या : स्वरुप खारगे

sakal_logo
By

दिव्यांग राखीव निधीचा
लाभ घ्या : स्वरुप खारगे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३१ : नगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण कार्यक्रमातंर्गत पाच टक्के राखीव निधी वितरीत करण्यात येतो. पालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांनी ३१ जुलैपर्यंत कागदपत्रासह अर्ज सादर करुन या निधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे.
शासनातर्फे दिव्यांगासाठी विविध योजना आहेत. पालिकेतर्फेही दिव्यांगासाठी ५ टक्के राखीव निधीचे वाटप करण्यात येते. त्याचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना युडीआयडी कार्ड बंधनकारक केले आहे. समाजकल्याण विभागाने २०१६ पासून दिव्यांगांना ओळखपत्र देणे बंद केले आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेलाही ओळखपत्र देण्याचे अधिकार नाहीत. ज्यांच्याकडे युडीआयडी कार्ड नसेल त्यांनी http://www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. या राखीव निधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील किमान ४० टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र (युडीआयडी कार्ड), नगरपरिषद कार्यक्षेत्रात रहिवाशी असल्याचे स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेत वैयक्तिक खाते असलेले बँक पासबूक झेरॉक्स या कागदपत्रांसह अर्ज पालिका कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकातून कळविले आहे.