सकाळ एज्यु बातमी

सकाळ एज्यु बातमी

लोगो- ३१ मेच्या अंकातून
...

‘सकाळ’ एज्युकेशन महायात्रेत ‘लकी ड्रॉ’ जिंकण्याची संधी

शनिवारपासून आयोजन ः करिअरविषयक मार्गदर्शक व्याख्यानेही

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ३१ : दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर महाविद्यालयीन शिक्षण व करिअरची नेमकी दिशा ठरवण्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत सकाळ एज्युकेशन महायात्रा होणार आहे. शनिवार (ता. ३) पासून सलग तीन दिवस हे प्रदर्शन होणार असून मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात हे प्रदर्शन होणार असून प्रदर्शनादरम्यान करिअरविषयक मार्गदर्शक व्याख्यानेही होणार आहेत. दरम्यान, एज्युकेशन महायात्रेत भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विद्यार्थ्यांना दररोज २ हजार ५०० रूपयांची बॅग जिंकण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.
पुण्यासह राज्यातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमांसाठीचे स्टॉल प्रदर्शनात असतील. महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या उपलब्ध असणाऱ्या पर्यायांची माहिती, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शनही होणार आहे. त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, गडहिंग्लज येथील भडगाव रोडवरील आर्केड कॉम्प्लेक्स येथे नऊ ते अकरा जूनला प्रदर्शन होणार आहे.
-----
येथे करा ‘स्टॉल्स’चे बुकिंग

शैक्षणिक प्रदर्शनात तुम्हाला तुमचा स्टॉल असावा, असे वाटतेय का... तर मग लवकरात लवकर संपर्क साधा आणि शिक्षण व करिअरबाबत मार्गदर्शन, माहिती विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तयार व्हा. अधिक माहितीसाठी संपर्क : विजय शिंदे (९९२२४१६०५५), बाजीराव पाटील (९९२२५०७१८५), शिवाजी खांडेकर (९९२२५०७१७७), दत्ता टोणपे (९८८११२९२७४), सुशांत सावंत (९९२१११५५२२).
.......

प्रदर्शनाचे प्रायोजक

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत फोर्ट इंटरनॅशनल डिफेन्स ॲकॅडमी- कोल्हापूर, एमआयटी-डब्ल्यूपीयू- पुणे पॉवर्ड बाय प्रदर्शनासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट- मिरज, आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च सेंटर- विटा सहप्रायोजक आहेत. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय- कोल्हापूर, संत गजानन महाराज ग्रुप ऑफ एज्युकेशन- गडहिंग्लज, नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट- पेठ, डीकेटीई- इचलकरंजी, अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी- आष्टा, जे. जे. मगदूम ट्रस्ट हे डायमंड स्पॉन्सर आहेत.
............

अशी होतील व्याख्याने

० शनिवार (ता. ३) ः - सकाळी साडेअकरा ते एक ः डॉ. अरुण प्रकाश (एमआयटी-डब्ल्यूपीए) ः चित्रपट निर्मितीचा अभ्यास का करावा?
- सायंकाळी चार ते पाच ः डॉ. स्वप्निल हिरकुडे (विभागप्रमुख ट्रेनिंग ॲंड प्लेसमेंट, संजय घोडावत युनिव्हर्सिटी) ः उच्च शिक्षणातील संधी व आव्हाने
- सायंकाळी पाच ते सहा ः प्रा. विजय नवले (प्रसिद्ध करिअर समुपदेशक) ः करिअरची सुयोग्य निवड
.......
० रविवार (ता.४) ः - सकाळी अकरा ते बारा ः अभिजित कुलकर्णी (ब्रिलिएंट प्रोफेशनल ॲकॅडमी) ः कॉमर्स आणि फायनान्समधील संधी
- दुपारी साडेतीन ते साडेचार ः विवेक वेलणकर (प्रसिद्ध करिअर समुपदेशक) ः दहावीनंतरची शाखा निवड
- सायंकाळी पाच ते सहा ः स्क्वाड्रन लीडर सुप्रिया भोसले (निवृत्त एअरफोर्स ऑफिसर) ः संरक्षण क्षेत्रातील संधी
- सायंकाळी सहा ते सात ः डॉ. अविनाश धर्माधिकारी (चाणक्य मंडल परिवार) ः दहावी, बारावीनंतरचे करिअर, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास
-------
० सोमवार (ता.५) ः - दुपारी एक ते दोन ः डॉ. डी. एन. मुदगल (संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट) ः ॲडव्हान्स इन इंजिनिअरिंग ॲंड फार्मसीमधील संधी
- सायंकाळी चार ते पाच ः अजित आपटे (पुणे) ः छत्रपती शिवाजी महाराज आणि मॉडर्न मॅनेजमेंट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com