कामगारच निघाला चोर

कामगारच निघाला चोर

०६३६७

कामगारासह भंगार विक्रेत्याला अटक
शाहू क्लॉथ मार्केट चोरी; लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई

कोल्हापूर, ता. १ ः येथील शाहू क्लॉथ मार्केटमधील इलेक्ट्रिक दुकानात चोरी करणाऱ्या कामगारासह भंगार विक्रेत्या साथीदाराला लक्ष्‍मीपुरी पोलिसांनी अटक केली. कामगार संदीप मारुतराव पुंगावकर (वय ५३, रा. सम्राट कॉलनी, कदमवाडी) आणि त्याचा साथीदार भंगार विक्रेता रफिक शौकत जत्राटे (५२, रा. गल्ली क्रमांक पाच, सरनाईक वसाहत, कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक इकबाल महात यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की शहरातील मध्यवर्ती ठिकाणातील शाहू क्लॉथ मार्केटमध्ये शिवाजी पार्क येथे राहणारे राजकुमार वरियलदास माखिजा यांचे राजू लाईट हाऊस नावाचे दुकान आहे. १८ ते २९ मे च्या दरम्यान बनावट चावीचा वापर करून दुकान आणि तेथे असलेल्या गोदामातून पंखे, गिझर, कुलर, लाईट माळा, वायर बंडल असा सुमारे ७२ हजार ७०० रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते. याची फिर्याद राजकुमार यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. यानंतर पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली महात यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशी दरम्यान चोरी केल्याची कबुली दिली. यामध्ये कामगार संदीप मुख्य सूत्रधार असून, त्याचा भंगार गोळा करणारा साथीदार यांना अटक केली. त्यांच्याकडून काही साहित्य जप्त केले असून, उर्वरित तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com