मोईन मोमीन यांचा बैल प्रथम

मोईन मोमीन यांचा बैल प्रथम

ich12.jpg
06401
इचलकरंजी ः येथे गुरुवारी झालेल्या बैल पळविण्याची शर्यतीमधील एक थरारक क्षण.

मोईन मोमीन यांचा बैल प्रथम
सुट्टा बैल पळवण्याची शर्यत; इचलकरंजीत बेंदूर सणानिमित्त आयोजन

इचलकरंजी, ता.१ ः कर्नाटक बेंदूर सणाचे औचित्य साधत इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळातर्फे गुरुवारी घेतलेल्या सुट्टा बैल पळवणे शर्यतीत मोईन मोमीन यांच्या बैलाने २८.३ सेकंदाची वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकवला. स्वप्निल कोळी यांच्या बैलाने (२८.४) व विजय तानाजी मोरे यांच्या बैलाने (२८.७) अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.
डीकेटीई नारायणमळ येथील पटांगणावर गुरुवारी सुट्टा बैल पळविणे शर्यती झाल्या. यामध्ये तब्बल ६१ बैलांच्या सहभागाची नोंद झाली होती. तीन दिवस चाललेल्या विविध गटातील शर्यती पाहण्यासाठी शहर व परिसरातील शर्यतप्रेमींसह तरुणांनी प्रचंड गर्दी केली होती. शासन नियमांचे पालन करत आणि पोलिस बंदोबस्तात गुरुवारी सुट्टा बैल पळविण्याची शर्यत झाली. यामधील विजेत्या प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये व शिल्ड, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व शिल्ड आणि तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व शिल्ड अशी बक्षिस देण्यात येणार आहेत.
दरम्यान, ३ जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनात विविध जातीवंत खिल्लार जनावरे पाहण्यास मिळणार आहेत. शर्यतीसह जनावर प्रदर्शनाचा बक्षिस वितरण समारंभ तसेच बेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम ५ जून रोजी गावभागातील जुनी गावचावडी महादेव मंदिर चौक येथे होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com