कुस्ती स्पर्धा आजपासून

कुस्ती स्पर्धा आजपासून

Published on

06427
कोल्हापूर ः महापालिकेतर्फे शुक्रवारपासून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी खासबाग मैदान सज्ज केले आहे.

राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धा
आजपासून रंगणार
कोल्हापूर, ता. १ ः महापालिकेतर्फे कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटासाठीच्या राजर्षी शाहू केसरी कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी (ता.२) सुरुवात होत आहे. खासबाग मैदानात होणाऱ्या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे.
आज सायंकाळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी पाहणी केली. शुक्रवारी सकाळी आठ ते बारापर्यंत कुस्तीगीरांची वैद्यकीय तपासणी व वजन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पहिल्या फेरीतील कुस्ती होणार आहेत. त्यावेळी औपचारिक उद्‍घाटन होणार आहे. शनिवारी सकाळी सात वाजता व सायंकाळी पाच वाजताही कुस्ती होणार आहेत. अंतिम सामना रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. त्यावेळी पैलवान शैलेश शेळके व पैलवान मारुती कोकाटे यांच्यात प्रेक्षणीय कुस्ती होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू छत्रपती महाराज भूषवणार असून, पालकमंत्री दीपक केसरकर व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त आडसूळ उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com