चेंबरचे शिष्टमंडळ महापालिकेत

चेंबरचे शिष्टमंडळ महापालिकेत

06414
कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले.

परवाना नूतनीकरणासाठी मुदतवाढी द्या
चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी; प्रशासक बलकवडे यांना निवेदन
कोल्हापूर, ता. १ : व्यवसाय परवाना नूतनीकरणाच्या मुदतवाढीबरोबरच व्हीनस कॉर्नर गाडीअड्ड्यात ट्रक पार्किंगला परवानगी मिळावी यासह व्यापाऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले.
अध्यक्ष संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन दिले. त्यात प्रामुख्याने व्यवसाय परवाना नूतनीकरण मुदतवाढ, कोल्हापूर शहरातील पार्किंग सुविधा व ट्रक टर्मिनल, टिंबर मार्केट परिसराचा फायनल ले-आऊट तयार करणे आदी बाबींचा समावेश होता.
व्यवसाय परवाना नूतनीकरणास मुदतवाढीसाठी फेब्रुवारीपासून पाठपुरावा केला जात आहे. प्रशासकांकडून तोंडी आश्‍वासन दिले जात असले तरी परिपत्रक काढले जात नाही. त्याबाबत शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर आज प्रशासकांनी पुढील आर्थिक वर्षापासून मुदतवाढ देण्याचे मान्य करत त्याचे परिपत्रक पंधरा दिवसांत काढले जाईल, असे सांगितले. व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्डामधील जागेवर अतिक्रमण झाले असून, याठिकाणी पर्यटकांसाठी प्रसाधनगृह बांधावे, अशी मागणीही केली. तसेच त्या ठिकाणी ट्रक पार्किंगला परवानगी मिळावी. जेणेकरून व्यापाऱ्यांना माल उतरवण्यास मदत होईल. तसेच सरस्वती टॉकीजजवळील बहुमजली पार्किंग लवकर पूर्ण करावे, अशीही मागणी केली. प्रशासकांनी जूनअखेर बहुमजली पार्किंग पूर्ण होत असल्याचे सांगितले.
टिंबर मार्केट परिसराच्या अंतिम ले-आऊटचा प्रश्‍न लवकर मार्गी लावावा, अशी मागणी केली. यावेळी चेंबरचे मानद सचिव धनंजय दुग्गे, खजिनदार हरिभाई पटेल, संचालक अजित कोठारी, संपत पाटील, राहुल नष्टे, अनिल धडाम, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, विजय हावळ, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे सुधीर आगरवाल, अशोक वाधवाणी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com