३५ टिपर बंद

३५ टिपर बंद

06429
कोल्हापूर : महापालिकेचे कचरा उठाव करणारे टिपर सध्या बंद अवस्थेत आहेत.

कचरा उठाव करणाऱ्या टिपरना
देखभालीअभावी लागली घरघर
३५ बंद अवस्थेत; कचरा उठावावर परिणाम
कोल्हापूर, ता. १ : शहरातील घरोघरी फिरून कचरा उठाव करणाऱ्या महापालिकेच्या टिपर वाहनांना देखभालीअभावी घरघर लागली आहे. इंजिन तसेच इतर महत्त्वाची कामे करायची असल्याने तब्बल ३५ टिपर बंद अवस्थेत आहेत. १०६ टिपर घेऊन साडेतीन वर्षे झाली असल्याने ही स्थिती यापुढे कायम राहण्याचा धोका आहे. त्यामुळे कचरा उठावावर परिणाम होत आहे.
महापालिकेने घरातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे उठाव करण्यासाठी टिपर घेतले. त्यासाठी वित्त आयोगातून निधी आला. २०१९ मध्ये डिझेलचे १०४ टिपर खरेदी केले. एक टिपर दररोज किमान ९० ते १०० किलोमीटर धावतो. या टिपरना साडेतीन वर्षे होऊन गेली आहेत. त्यांचे टायर तसेच इतर किरकोळ कामांची देखभाल एका दिवसात होत होती; पण आता त्यांची इंजिनची तसेच इतर महत्त्वाची कामे करावी लागत आहेत. या कामांअभावी टिपर बंद पडत आहेत. सध्या ३५ टिपर बंद अवस्थेत आहेत. त्यातील सात ते दहा इतक्यांचे टप्प्याटप्प्याने काम केले जात आहे. त्यामुळे वर्कशॉपमध्ये ते थांबून आहेत. २०२१ मध्ये सीएनजीवरील ६५ टिपर खरेदी केले आहेत. त्यांची अजून महत्त्वाची कामे निघत नाहीत.
टिपरवर शहरातील कचरा उठाव अवलंबून असल्याने देखभालीसाठी किमान दहा टिपर बंद ठेवले तर नियोजन व्यवस्थित राहू शकते; पण त्यापेक्षा जास्त संख्येने टिपर बंद असल्याने नियोजन विस्कटत चालले आहे. यापुढेही या डिझेल टिपरची संख्या व्यवस्थित ठेवण्यासाठी देखभाल वेळीच करण्याचे नियोजन आवश्‍यक आहे. अन्यथा कचरा उठावावर परिणाम होऊन रस्त्यावर कचरा पसरण्यास सुरूवात होते.
-----------------
कोट
जुने टिपर जास्त धावत असल्याने त्यांची मोठी कामे करावी लागत आहेत. ३५ टिपर सध्या बंद आहेत. आता टप्प्याटप्प्याने कामे केली जात आहेत.
- राहुल राजगोळकर, विभागीय आरोग्य निरीक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com