एज्युकेशन दहावी निकाल एकत्रित

एज्युकेशन दहावी निकाल एकत्रित

शाहू दयानंद हायस्कूलचा निकाल ९७ टक्के
कोल्हापूर : आर्य समाज एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित शाहू दयानंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९७ टक्के लागला. संस्थेचे अध्यक्ष अॅड. इंद्रजित पाटील-कौलवकर, मानद सचिव अॅड. अनिरुद्ध पाटील-कौलवकर यांचे प्रोत्साहन, तर मुख्याध्यापिका कलिकते, सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांत अनुक्रमे सिद्धी त्रिमुखे (७६. ६६), सतीश बाचणकर (७४.८०), प्रशांत गायकवाड (७२.४० टक्के) यांनी यश मिळवले.
...
महाराष्ट्र हायस्कूलचा निकाल ९८.३६ टक्के
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९८.३६ टक्के लागला. गुणानुक्रमे आशुतोष सावंत (९८.४०), गंधर्व पाटील (९७), प्रज्वल पाटील (९६.२०), ईश्वरी पाटील (९६.२०), शुभ्रा देशमुख (९६.२०) यांनी यश मिळविले. श्रावणी खारगेची घरची परिस्थिती बेताची असूनही तिने ९०.८० टक्के गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन के. जी. पाटील, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ संचालक, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, उपमुख्याध्यापक उदय पाटील, पर्यवेक्षक जे. पी. कांबळे, एस. ए. जाधव, दहावीचे वर्गशिक्षक, सेवकांचे प्रोत्साहन मिळाले.
...
कोरगावकर हायस्कूलचा निकाल ९३.२० टक्के
कोल्हापूर : कोरगावकर हायस्कूलचा निकाल ९३.२० टक्के लागला. समृद्धी चव्हाण (८६.८७), कुमार संक्रमनर, हर्ष माने (७७) हे विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम आले. चार विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली. बावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पर्यवेक्षक रामचंद्र मोरे, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर, अध्यक्षा सुचेता कोरगावकर, सचिव एम. एस. पाटोळे यांचे प्रोत्साहन लाभले.
...
लोहिया हायस्कूलचा ९९.५३ टक्के नकाल
कोल्हापूर : सौ. स. म. लोहिया हायस्कूल प्रशालेचा निकाल ९९.५३ टक्के लागला. पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार संस्थेचे सहसचिव, प्राचार्य एस. एस. चव्हाण, उपमुख्याध्यापक पी. बी. उपाध्ये, पर्यवेक्षिका एस. बी. पाटील यांच्या हस्ते झाला. ईशान कुलकर्णी (९९.८०), विश्ववरद कांबळे (९५.४०), अथर्व क्षीरसागर (९५) टक्के यश मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार प्रशालेतर्फे केला. एस. डी. मालेकर, व्ही. जी. कुलकर्णी, बी. एस. चोपदार, एच. के. पवार, यू. बी. आवळे, सौ. एस. एस. मिराशी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.
...
‘प्रिन्स शिवाजी इंग्लिश’चा निकाल १०० टक्के
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल शाखेचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे सम्राज्ञी सावंत (८९), चिन्मय शेटे (८८.२०), आर्यन साळुंखे (८८.२०), वेदांत पार्ट (८६.४०) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, संस्थेचे सर्व संचालक, मुख्याध्यापिका रणू निंबाळकर, अधीक्षक सी. एम. गायकवाड, सर्व शिक्षक, शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले.
...
जय भारत हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
कोल्हापूर : जय भारत हायस्कूलचा सेमी माध्यमिकचा निकाल शंभर टक्के, तर मराठी माध्यमाचा निकाल ९६.४९ टक्के लागला. गुणानुक्रमे वसुंधरा इंगवले (९९.६०), श्रेयसी पाटील (९५), सृष्टी कोडग (९४.६०) यांचा समावेश आहे. संस्थाध्यक्ष पी. एस. जाधव, उपाध्यक्ष सुमित्रा जाधव, मुख्याध्यापिका सौ. अश्‍विनी पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com