आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके

आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे- डॉ महादेव नरके

आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे.
- डॉ महादेव नरके

डी.वाय.पी. पॉलिटेक्निक दहावीनंतरच्या संधींबाबत कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ५ : विद्यार्थ्यांनी आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि कौशल्ये ओळखून करिअरची दिशा निवडावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे आयोजित ‘१० वीनंतरच्या करिअरच्या संधी व डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रिया’ या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. नितीन माळी यांनी विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. नरके म्हणाले, की दहावीनंतर कोणती शाखा निवडावी, करिअरची दिशा काय असावी, भवितव्य नेमकं कशात आहे? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडलेले असतात. सध्या करिअरच्या खूप मोठ्या संधी अनेक क्षेत्रांत निर्माण झाल्या आहेत. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. अशा परिस्थितीत आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि अंगी असलेले कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे. पालकांनी आपली आवड विद्यार्थ्यांवर लादू नये. आपल्यातील वेगळेपण ओळखा आणि त्यात करिअर करा, असेही त्यांनी सांगितले.
ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. नितीन माळी यांनी विद्यार्थी व पालकांना ‘पीपीटी’च्या माध्यमातून दहावीनंतर कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत, याची माहिती दिली. डॉ. नरके व प्रा माळी यांनी विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले. या वेळी उपप्राचार्या मीनाक्षी पाटील, रजिस्ट्रार सचिन जडगे, प्रा. महेश रेणके, प्रा. बी. जी. शिंदे, प्रा. अक्षय करपे, प्रा. पी. के. शिंदे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com