कॉमन पत्रके कॉमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉमन पत्रके कॉमन
कॉमन पत्रके कॉमन

कॉमन पत्रके कॉमन

sakal_logo
By

07283
सचिन जाधव यांची निवड
कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शहर-जिल्हा कार्यालयात संघटन बांधणीसंदर्भात आयोजित बैठकीत सचिन जाधव यांची शहर-जिल्हा कार्यालयीन चिटणीसपदी एकमताने निवड केली. प्रारंभी शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. शहर सहचिटणीस संभाजी जगदाळे, जिल्हा सहचिटणीस दिलीपकुमार जाधव, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली सूर्यवंशी, डॉ. संदेश कचरे, ज्येष्ठ शहर कार्यकारिणी सदस्य मोहन पाटील, डी. के. हवालदार, विजय लोंढे आदींनी अनुमोदन दिले. चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजी पाटील, गीता जाधव, प्रिया जाधव, अशोक चव्हाण, लखन मुलाणी, उमाजी सनदे आदी उपस्थित होते.
...
प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आवाहन
कोल्हापूर : प्रेमसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे एस.एस.सी.मध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या समाजातील गरीब, गरजू, गुणवंत, हुशार विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष शैक्षणिक, आर्थिक मदत दिली जाते. तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शनही केले जाते. गरीब विद्यार्थांना पदविका तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले जातात. याकरिता योग्य गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांनी मंगळवार पेठ, पाटाकडील तालीमजवळील संस्था कार्यालयात लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मांगलेकर यांनी पत्रकाद्वारे केले.
...
‘उत्सव स्वरांचा आणि तालांचा’ला प्रतिसाद
कोल्हापूर : जायंटस्‌ ग्रुप ऑफ कोल्हापूर पर्लतर्फे ‘उत्सव स्वरांचा आणि तालांचा’ हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे घेतला. गायक सूर्यकांत मोरे, प्रकाश मोरे, प्रा. संजय नाकील, रवींद्र मेस्त्री, सुकुमार भोसले, गायिका मंदाकिनी साखरे, सुजाता मोरे, नृत्यांगना श्रद्धा पेवेकर-मोरे, श्रावणी शिंदे कलाकरांनी एकल, युगुलगीते सादर केली. तसेच स्पर्श अॅकॅडमीच्या कलाकारांनी गाण्याबरोबर समूहनृत्य सादर केले. दरम्यान, दहावीत चांगले गुण मिळवल्याबद्दल श्रावणीचा ट्रॉफी देऊन सत्कार केला. मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीराम फौंड्री, चितळे उद्योग समूह, उमेश पोवार, कमांडंट राजाराम शिंदे, कर्नल सुळकुडे, डॉ. पोळ, बबिता जाधव, आकाश व्हीजनचे संचालक प्रसाद कुलकर्णी, स्पर्श ॲकॅडमीचे संचालक अरविंद कोळी यांनी सहकार्य केले.