सामुदायिक विवाह सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामुदायिक विवाह सोहळा
सामुदायिक विवाह सोहळा

सामुदायिक विवाह सोहळा

sakal_logo
By

07182

सत्यशोधक पद्धतीने दहा दांपत्यांचा सामुदायिक विवाह

कोल्हापूर, ता. ५ ः पारंपरिक लग्नाचा कोणताही थाट नाही. मंडपात नवदांपत्यांसह महापुरूषांच्या प्रतिमा आणि आजन्म एकमेकांशी प्रामाणिक राहण्याचा संकल्प अशा माहौलात आज येथील दहा दांपत्ये सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाली. येथील आधार फाउंडेशनतर्फे झालेल्या या सोहळ्यात सर्वधर्मीयांची उपस्थिती होती. चित्रदुर्ग मठात हा सोहळा सजला.
सोहळ्यासाठी चित्रदुर्ग मठाच्या आवारात भव्य मंडप उभारला होता. मंचावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्यासह अकरा महापुरुषांच्या प्रतिमा होत्या. सुरवातीला महापुरूषांना अभिवादन झाले. त्यानंतर महात्मा फुले यांच्या सत्याच्या खंडाचे गीत गायन झाले. वधू-वर परिचयानंतर वधू-वरांना आयुष्यभर एकमेकांप्रती आदर करण्याची शपथ देण्यात आली आणि त्यानंतर नवदांपत्यांवर पुष्पवृष्टी करत हा सोहळा झाला. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जुन्या रूढी- परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने विवाह केलेल्या या दांपत्यांना प्रत्येकी २० हजार रुपये आणि संस्थेला चार हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. आंतरधर्मीय विवाह केलेल्या दोन जोडप्यांना ५० हजार रुपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे, सचिव प्रशांत वाघमारे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. आकाश पट्टण, किरण काळेमणी, अजित यतनाळ, उमेश सुतार, डॉ. अरुण धुमाळे, प्रा. आनंद भोजने, सुखदेव बुध्याळकर उपस्थित होते.