परिख पूल बैठक

परिख पूल बैठक

परिख पुलासाठी वकिलांचे पॅनेल
नेमून सहकार्य करू; जिल्हा बार असोसिएशनची ग्वाही
कोल्हापूर, ता. ६ : परिख पुलाचा लोकाभिमुख प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आवश्‍यक तिथे कायदेशीर लढ्यासाठी वकिलांचे पॅनेल नेमून आवश्‍यक कायदेशीर सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने दिली.
‍परिख पूल नुतनीकरण समितीने पुलाबाबत रेल्वे व महापालिकेला नोटीस दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नुतनीकरण समितीतर्फे आज कोल्हापूर जिल्हा बारअसोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह पाटील, ॲड. तेजगोंडा पाटील व इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
त्यावेळी परिख पुलासंदर्भात रेल्वे प्रशासन व महानगरपालिकेला देण्यात आलेल्या नोटीस संबंधी व पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्ष अॅड. प्रशांत देसाई यांनी प्रशासकीय स्तरावर तसेच आवश्यक तिथे कायदेशीर लढयासाठी वकिलांचे पॅनेल नेमून हा लोकाभिमुख प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे आवश्यक ते सर्व कायदेशीर सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. समितीच्या शिष्टमंडळात संतोष रेडेकर, सुशील हंजे, फिरोज शेख, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनिअर्सचे अध्यक्ष अजय कोराणे, सचिव राज डोंगळे तसेच अॅड. अजितसिंह पवार यांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com