क्रिकेट बातमी

क्रिकेट बातमी

Published on

क्रिकेट खेळाडूंमध्ये नवचैतन्य
महाराष्ट्र प्रीमियर लिगमध्ये कोल्हापूरचे सात जण; एमसीएच्या विविध निवड समितीवरही वर्णी

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १२: एकीकडे जिल्ह्यात क्रिकेटचा टक्का वाढत असताना त्याला पोषक अशा वातावरणाच्या निर्मितीमुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. एमसीएच्या विविध निवड समितीसह राज्याची होणारी क्रिकेट लीग स्पर्धेने चांगल्या खेळाडूंना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळणार आहे. अशातच कोल्हापूरचे सात खेळाडू विविध संघांतून लिलाव प्रक्रियेने सहभागी झाले आहेत, तर माजी खेळाडू व विद्यमान सदस्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाले आहेत.    
कोल्हापूरच्या क्रिकेटला मोठा इतिहास आहे. असे असतानाही मधल्या काही काळामध्ये काही मोजक्या स्पर्धांपुरते क्रिकेट मर्यादित राहिले होते. काहीच खेळाडूंना संधी मिळत असते. मात्र, अनेक खेळाडू पुढील हंगामाची वाट पाहण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नसल्याने या खेळातून परावृत्त होऊन अन्य दिशा निवडण्याची मानसिकता होऊ लागली होती. मात्र, सध्या खेळाडूंना पुन्हा संधीचे नवे दालन खुले झाले आहे. कोट्यवधींची गुंतवणूक होऊन राज्यातील काही शहरांचे संघ बनवले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर एमपीएल ही स्पर्धा होत असल्याने राज्यभरातील खेळाडू एका मंचावर आले आहेत. यातच कोल्हापूरचे सात खेळाडू विविध संघांतून खेळताना दिसतील. वयोगट अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा, निमंत्रितांच्या स्पर्धांसह राज्याच्या काही स्पर्धा इतकेच क्रिकेट होते. याव्यतिरिक्त व्यावसायिक स्पर्धा नसल्याने काही संधी उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, व्यावसायिक स्पर्धेचे दालन खुले होऊन खेळाडूंना चांगला पैसा मिळणार आहे. यामुळे चालू हंगामासाठी ज्या खेळाडूंची निवड झाली नाही, त्यांना स्वतःच्या खेळाची गुणवत्ता सुधारून पुढील हंगामासाठी अधिक सक्षम स्पर्धक होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. 

चौकट
संघ व निवड झालेले खेळाडू 
कोल्हापूर टस्कर ः श्रेयस चव्हाण व रवी चौधरी
पुणेरी बाप्पा ः वैभव चौगुले
छत्रपती संभाजी किंग्ज ः रणजित निकम व अनिकेत नलवडे
सोलापूर रॉयल्स ः विशांत मोरे
रत्नागिरी जेट्स ः रोहीत पाटील  

संघ व प्रशिक्षक 
निवड समिती सदस्य शैलेश भोसले सोलापूर रॉयल्स संघाच्या फलदांज प्रशिक्षक व संघ सल्लागार पदी निवड झाली आहे, तर माजी रणजी खेळाडू संग्राम अतितकर यांची कोल्हापूर टस्कर संघाच्या मेंटारपदी निवड झाली आहे. 

कोट 
क्रिकेटमध्ये निर्माण होणाऱ्या संधींमुळे खेळाडूंना चांगले दिवस येत आहेत. अशा स्पर्धांमुळे उत्तम खेळाडू निर्माण होण्याची संधी निर्माण होते. शिवाय पैसा व प्रसिद्धी हे दोन्हीही बोनस म्हणून पदरी पडतात. यामुळे कोल्हापूरच्या क्रिकेटचा येता हंगाम अधिक आव्हानात्मक असणार आहे.
-चेतन चौगुले, अध्यक्ष, के.डी.सी.ए.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com