आजरा ः जे. पी. नाईक पतसंस्था शाखा उद्घाटन

आजरा ः जे. पी. नाईक पतसंस्था शाखा उद्घाटन

ajr142.jpg....
09265
गडहिंग्लज ः येथे जे. पी. नाईक पतसंस्था शाखा उद्घाटनप्रसंगी पाहुणे जे. बी. बार्देस्कर यांचा सत्कार करताना डाॅ. शिवशंकर उपासे. या वेळी प्रा. सुनील शिंत्रे, डाॅ. विवेक पाटणे व अन्य.
-------

जे. पी. नाईक पतसंस्थेच्या
गडहिंग्लज शाखेचे उद्घाटन
आजरा, ता .१४ ः येथील जे. पी. नाईक पतसंस्थेच्या गडहिंग्लज शाखेचे उद्घाटन साधना शिक्षण संस्थेचे सचिव व समारंभाचे अध्यक्ष जे. बी. बार्देस्कर यांच्या हस्ते झाले. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांच्या हस्ते शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्याप्रसारक मंडळ गडहिंग्लज संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सतीश घाळी यांच्या हस्ते लक्ष्मी- गणपती व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
संचालक शिवाजी बिद्रे यांनी स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. शिवशंकर उपासे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडला. श्री. बार्देस्कर म्हणाले, ‘पहिल्याच दिवशी संस्थेकडे ३५ लाखांच्या ठेवी जमा झाल्या. संस्थेचे गडहिंग्लजमध्ये स्वागत करतो.’ प्रा. शिंत्रे म्हणाले, ‘संस्थेने राैप्यमहोत्सवी वर्षात गडहिंग्लज व कोल्हापूरला शाखाविस्ताराचे नियोजन ठेवले. गडहिंग्लजला शाखा झाली.’ डाॅ. घाळी यांनी, संस्थेचा विस्तार राजधानीपर्यंत पोहचावा, असे सांगितले. दत्ता देशपांडे, बाळेश नाईक व रवळू पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा संचालकांनी गुलाबाचे रोप व पुस्तक देत सत्कार केला. यावेळी डाॅ. विवेक पाटणे, शिवप्रसाद तेली, संतोष तेली, डाॅ. सदानंद पाटणे, नंदकुमार शेळके, मधुकर येसणे, संजय चाळक, प्रकाश कुंभार, रोहन कुरबेट्टी, डाॅ. अंजनी देशपांडे, श्री. काटे, संचालक व कर्मचारी उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन, श्रावण जाधव यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com