अभय योजनेबाबत आज मार्गदर्शन शिबीर

अभय योजनेबाबत आज मार्गदर्शन शिबीर

अभय योजनेबाबत
आज मार्गदर्शन शिबिर
इचलकरंजी ः ज्या उद्योजक व व्यापारी यांची ‘व्हॅट’ व ‘जीएसटी’ची प्रकरणे प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर अंतर्गत अभय योजनेबाबत मार्गदर्शन शिबिर गुरुवारी (ता. १५) कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. ज्या उद्योजक व व्यापारी यांची व्हॅट कायद्याखाली थकबाकी प्रलंबित आहे, अशा उद्योजक व व्यापारी यांना या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. याचबरोबर जीएसटी योजनेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योजक व व्यापारी यांच्या या योजनेबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. सकाळी अकरा वाजता वस्तू व सेवा कर भवन, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com