ललित गांधी

ललित गांधी

09414
कोल्हापूर : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करताना ललित गांधी. या वेळी धैर्यशील माने, भरत गांधी, दर्शन गांधी, जयेश ओसवाल उपस्थित होते.


औद्योगिक विकासाचे
प्रश्‍न सोडवू : मंत्री सामंत
ललित गांधी यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर, ता. १४ : कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासंबंधी सर्व प्रश्‍न प्राधान्याने मार्गी लावले जाती, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या सततच्या पाठपुराव्याने यापूर्वीचे जवळपास सर्वच प्रश्‍न मार्गी लावल्याचे सांगुन सामंत यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतीसाठी शंभर कोटी रूपये, नवीन तीन औद्योगिक वसाहती हे प्रश्‍न सोडवल्याचे सांगितले.
मंत्री सामंत यांनी कोल्हापूर दौऱ्यात गांधी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी खासदार धैर्यशील माने ही उपस्थित होते. या वेळी गांधी यांनी कोल्हापूरमधील नवीन एमआयडीसी, कोल्हापूरच्या उद्योगांच्या विकासाठी मेगा प्रोजेक्ट उभारणी, सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा आदी प्रश्‍न मांडले.
या वेळी महाराष्ट्र चेंबरचे रमाकांत मालू, नितिन धूत, प्रकाश शहा, कोल्हापूर चेंबरचे संजय शेटे, प्रदीप कापडीया, जयेश ओसवाल, इंजिनिअर असोसिएशनचे दिनेश बुधले, ‘गोशिमा’चे दिपक चोरगे, ‘कागल फाईव्ह स्टार’चे हरिशचंद्र धोत्रे, ‘सीआयआय’चे सोहन शिरगांवकर, ‘क्रिडाई’चे राजीव पारीख, के. पी. खोत, संदीप मिरजकर, गुजरी जैन संघाचे राजेश ओसवाल, भक्तीपुजानगर जैन संघाचे राजू सुखराज, महेंद्र जैन, प्रदीप जैन आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com